Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा बस स्थानकातील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था.( प्रवाशांचे आरोग्य धोक्यात; मनविसेचा प्रशासनाला इशारा.)

आजरा बस स्थानकातील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था.( प्रवाशांचे आरोग्य धोक्यात; मनविसेचा प्रशासनाला इशारा.)

आजरा बस स्थानकातील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था.
( प्रवाशांचे आरोग्य धोक्यात; मनविसेचा प्रशासनाला इशारा.)

आजरा, प्रतिनिधी दि. ८

आजरा बस स्थानकातील पुरुष स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्वच्छतागृहात सर्वत्र घाण साचली असून तुटलेले दरवाजे, फुटलेल्या फरशा, असह्य दुर्गंधी आणि अस्वच्छ परिसरामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे स्वच्छतागृहाच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या व इतर कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला आढळून आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशी परिस्थिती असणे ही आजरा आगार प्रशासनाच्या निष्काळजीपणाची परिसीमा असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिक या बस स्थानकाचा वापर करतात. मात्र, मूलभूत सुविधांकडे होत असलेले दुर्लक्ष पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, आजरा तालुक्याचे अध्यक्ष यश सुतार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

चौकट : मनविसेच्या प्रमुख मागण्या.

१) स्वच्छतागृहाची तात्काळ संपूर्ण साफसफाई व निर्जंतुकीकरण करावे. तुटलेले दरवाजे, फुटलेल्या फरशा व इतर दुरुस्ती त्वरित करावी.

२)परिसरात मद्यपान करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी.

३) स्वच्छतागृहाच्या नियमित देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमावा.‌ अन्यथा विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. अशी माहिती मनसेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.