🟣झाडे फक्त तोडणार की लावणारही – वनविभागाकडे १४,६४० झाडांच्या संगोपनाचा आराखडाच नाही.- वृक्षप्रेमी समूह आजरा.- पत्रकार परिषदेत माहिती.
🟣शक्तीपीठ महामार्ग विरोधात निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार.
( चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ विरोधी रथयात्रा उत्साहात.)
🟣झाडे फक्त तोडणार की लावणारही – वनविभागाकडे १४,६४० झाडांच्या संगोपनाचा आराखडाच नाही.- वृक्षप्रेमी समूह आजरा.- पत्रकार परिषदेत माहिती.
आजरा.- प्रतिनिधी.
वाटंगीनियोजन न मिळाल्यास कोर्टात जाण्याचा आजरा वृक्षप्रेमी समूहाचा मानस आहे. काही धक्कादायक
असल्याचे पत्रकार बैठकीत सांगण्यात आले. यामध्ये
संकेश्वर-बांदा रस्ता रुंदीकरणादरम्यान झालेल्या अतोनात वृक्षतोडीमुळे आजरा परिसरातील पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र खिन्नता पसरली होती. यातूनच केवळ शासकीय यंत्रणेवर विसंबून न राहता स्वतः कृती करण्याचा निर्धार करत, विविध क्षेत्रांतील अनुभवी नागरिकांनी एकत्र येऊन ‘वृक्षप्रेमी समूह’ स्थापन केला. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या समूहाने आज आजरा परिसरातील पर्यावरणाचा एक सजग रक्षक म्हणून ओळख निर्माण केली आहे.
चौकट
माहिती अधिकारात वनविभागाचा धक्कादायक खुलासा. रस्ता रुंदीकरणात नक्की किती झाडे जाणार आणि त्याबदल्यात काय होणार, याची स्पष्टता येण्यासाठी वृक्षप्रेमी समूहाने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. बऱ्याच प्रतीक्षेनंतर वनविभागाने दिलेल्या उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. चंदगड – इब्राहिमपूर-वाटंगी फाटा- महागाव ते जिल्हा हद्द या रस्ता रुंदीकरणादरम्यान तब्बल ३,६६० झाडे तोडली जाणार आहेत, तर त्याच्या बदल्यात १४,६४० झाडांची लागवड केली जाणार आहे.
परंतु, ही १४,६४० झाडे नक्की कुठे लावली जाणार? त्यांची उंची किती असणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या झाडांचे संगोपन कोण आणि कसे करणार? याची कोणतीही ठोस माहिती वनविभागाकडे उपलब्ध नाही.
💥वृक्षप्रेमी समूह सदस्यांनी केली इच्छा व्यक्त.
संकेश्वर = बांदा रस्ता रुंदीकरणानंतरभरपाई म्हणून वृक्ष लागवड आणि संवर्धन निव्वळ कागदोपत्री राहिल्याची स्थानिक आजरेकरांची भावना आहे. याकामी ईतर पर्यावरणप्रेमीनि सुद्धा लक्ष घालावे.
तसेच रामतीर्थ परिसर येथील ज्या ठिकाणी समूहाने अडीच वर्ष राबून ३००, ३५० देशी झाडे जगवली तेथील निलगिरी ची झाडे तातडीने काढून घेतल्यास, कमीतकमी हानी होऊन लोकसहभागातून जंगल संवर्धनाचे उत्तम उदाहरण घालून देता येईल. याबाबत पुढील लढा लढण्यात येणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगण्यात आले यावेळी
डॉ गौरी भोसले, मीना शिरगुप्पे
पुष्पलता घोळसे, सी आर देसाई, सुभाष विभुते
दशरथ सोनुले, विलास पोवार सह वृक्षप्रेमी समूहाचे सदस्य उपस्थित होते.
🟣शक्तीपीठ महामार्ग विरोधात निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार.
( चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ विरोधी रथयात्रा उत्साहात.)
आजरा.- प्रतिनिधी.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार चंदगड आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. आज चंदगड येथील कानूर गावातून शक्तिपीठ विरोधी रथयात्रात निघाली कानूर मधून ही यात्रा कुरणी, माळुंगे, बुजवडे गवसे या गावातून आजरा तालुक्यात आली. यावेळी म्हाळुंगे सरपंच विठोबा गावडे, कृष्णा पाटील सहभागी झाले होते.
आजरा तालुक्यात पोळगाव, एरंडोल, वेळवटी, देवर्डे, मसुली या गावातून पेरणालीमध्ये आली. प्रत्येक गावात कोपरा सभा घेत शक्तिपीठ महामार्गाला आपला विरोध का अशी भूमिका यावेळी कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड सम्राट मोरे, के के भारतीय या कार्यकर्त्यांनी मांडली. प्रत्येक गावात कोपरा सभा होऊन ही रथयात्रा पुढे भुदरगड तालुक्यात निघाली.
शक्तिपीठ विरोधी रथयात्रेत कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड सम्राट मोरे के के भारतीय, विजय पवार, मायकल बारदेस्कर, पांडुरंग मुगडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पेरणोली येथील सभेत तानाजी देसाई, सुभाष देसाई यांनी भूमिका मांडून उद्याचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार केला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
