Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रदेशी वाण संवर्धन करण्याच्या हेतूने आजरा घनसाळ - शुद्ध बियाणे निर्मितीसाठी प्रोत्साहन.(...

देशी वाण संवर्धन करण्याच्या हेतूने आजरा घनसाळ – शुद्ध बियाणे निर्मितीसाठी प्रोत्साहन.( आज दि. ८ रोजी घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा, शेतकरी मेळावा )🟣रायफल असोसिएशन तर्फे २९ व्या कॅप्टन एस जे ईजिएकल या स्पर्धा.

🟣देशी वाण संवर्धन करण्याच्या हेतूने आजरा घनसाळ – शुद्ध बियाणे निर्मितीसाठी प्रोत्साहन.
( आज दि. ८ रोजी घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा, शेतकरी मेळावा )
🟣रायफल असोसिएशन तर्फे २९ व्या कॅप्टन एस जे ईजिएकल या स्पर्धा.

🟣देशी वाण संवर्धन करण्याच्या हेतूने आजरा घनसाळ – शुद्ध बियाणे निर्मितीसाठी प्रोत्साहन.
( आज दि. ८ रोजी घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा, शेतकरी मेळावा )

आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून यावर्षी काही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे नियोजन करणेत आले आहे. यानुसार देशी वाण संवर्धन करण्याच्या हेतूने आजरा घनसाळ शुद्ध बियाणे निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. यासाठी सोमवार दि. ०८ जुन रोजी दुपारी एक वा. आजरा तालुक्यातील घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा,शेतकरी मेळावा मृत्युंजयकार कै. शिवाजीराव सावंत स्मृतीदालन आजरा याठिकाणी आयोजित केला आहे. यामध्ये विविध तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी इ. उपस्थित राहणार आहेत.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्री गाडे, उपसभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषदेचे सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, गटविकास अधिकारी सुभाष सावंत व कृषि अधिकारी दिनेश शेटे यांनी केले आहे.

🟣रायफल असोसिएशन तर्फे २९ व्या कॅप्टन एस जे ईजिएकल या स्पर्धा.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

मुंबई येथे ३ मे ते ६ मे या दरम्यान महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे २९ व्या कॅप्टन एस जे ईजिएकल या स्पर्धा मुंबई वरळी येथे भरवण्यात आल्या होत्या.
त्यामध्ये दहा मीटर एअर रायफल वैयक्तिक या प्रकारात आपल्या ड्रीम ओलंपियन शूटिंग अकॅडमीची रायफल शूटर खेळाडू उचगाव मधील अनिल चौगुले वतनदार यांची कन्या तृप्ती अनिल चौगुले हिने सर्व युथ सोळा वर्षे आतील.. युथ १९ वर्ष आतील जूनियर २१ वर्ष आतील आणि सीनियर २१ वर्षांवरील या चारही खेळ प्रकारात वैयक्तिकरित्या ४०० पैकी ३९२ इतका स्कोर मारून
वरील चारीही कॅटेगरीमध्ये चार रोप्य पदकांची कमाई करून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे तसेच आपल्या ड्रीम ओलंपियन शूटिंग अकॅडमी चे नाव केले त्यासाठी तिचे अकॅडमी तर्फे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.