Home कोंकण - ठाणे दिल्लीत जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन.- तरुणांचा मोठा सहभाग.

दिल्लीत जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन.- तरुणांचा मोठा सहभाग.

दिल्लीत जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन.- तरुणांचा मोठा सहभाग.

नवी दिल्ली.- वृत्तसंस्था.

दिल्लीत जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं . या आंदोलनाला हजारो तरुण उपस्थित होते. नीट परिक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. यावेळी तिथे एक जण ‘हिट’ घेऊन पोहोचला. नवी दिल्ली येथे कॉकरोच जनता पार्टीनं जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके उपस्थित होते. या आंदोलनाला हजारो तरुण उपस्थित होते. नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी दिली. यावेळी काही आंदोलकांनी झुरळ्यांचे फोटो असलेले टी शर्ट्स परिधान केले होते. तर काहींनी झुरळांचे फोटो असलेले मास्क घातले होते. आंदोलन सुरू असताना तिथे एक जण हातात हिट स्प्रे घेऊन पोहोचला. त्यामुळे आंदोलनस्थळी काही वेळ गोंधळ उडाला. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या तरुणाच्या हातात एक फ्रेम होती. त्यात कॉकरोच जनता पार्टीचा लोगो होता. तरुणानं त्या फ्रेमवर हिट स्प्रे फवारुन सीजेपी आणि त्यांच्या समर्थकांवर निशाणा साधला. ‘सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचे कोट्यवधी पाठीराखे असल्याचं सांगितलं जातं. पण आंदोलनस्थळी अतिशय मोजके लोक दिसले. मग दोन कोटी फॉलोअर्स असल्याचा दाव्याचं नेमकं काय झालं’. असा खोचक सवाल त्यांनी विचारला. या आंदोलनाच्या माध्यमातून देशाला चुकीच्या दिशेनं नेलं जात असल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीनं आंदोलनाला विरोध दर्शवला. भारतात नेपाळ आणि बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होऊ नये, असं त्यानं म्हटलं. त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी आंदोलनाला ‘फ्लॉप’ म्हटलं. आपला भाजप किंवा अन्य कोणत्याही अन्य राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. सीजेपी समर्थक आणि आंदोलक विरोधक आमनेसामने येताच वातावरण तापलं. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यांच्याकडून एकमेकांच्या दाव्यांवर आणि हेतूंवर शंका, प्रश्न उपस्थित करण्यात आले. तिथे उपस्थित असलेले पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी परिस्थितीवर नजर ठेवून होते.

आमचं आंदोलन विद्यार्थी आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित असल्याचं सीजेपी समर्थकांनी म्हटलं. सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आमच्या मागण्या गांभीर्यानं ऐकून घ्यायला हव्यात, असा आग्रह आंदोलकांनी धरला.

कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यांनी शनिवारी जंतरमंतरवर आंदोलन केलं. या पक्षाचं हे पहिलंच आंदोलन होतं. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. त्यासाठी ते आज अमेरिकेहून भारतात दाखल झाले होते. या दरम्यान दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.