Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा येथे ‘भारत ई-सेवा केंद्र’ (जनता एजन्सी) चा आज शुभारंभ

आजरा येथे ‘भारत ई-सेवा केंद्र’ (जनता एजन्सी) चा आज शुभारंभ

आजरा येथे ‘भारत ई-सेवा केंद्र’ (जनता एजन्सी) चा आज शुभारंभ.

आजरा.- प्रतिनिधी.

नागरिकांना शासकीय व ऑनलाइन सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आजरा येथे ‘भारत ई-सेवा केंद्र’ (जनता एजन्सी ) सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन आजरा तहसिलदार समीर माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई व विकास कोलते उपस्थित होते. कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक प्रो. डॉ. अशोक बाचुळकर यानी केले. या केंद्राच्या माध्यमातून आता नागरिकांना विविध शासकीय दाखले, अर्ज आणि इतर ऑनलाइन सुविधा एकाच ठिकाणी अत्यंत जलद गतीने मिळणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार असून प्रशासकीय कामात सुलभता येईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रसंगी जनता गृहतारण संस्थेचे संचालक, अखिल भारतीय मराठा महासंघ पदाधिकारी व सदस्य, आजरा तालुका सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, पेन्शनर संघटना, ग्राहक कल्याण फौंडेशन, नागरिक, व्यापारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेला उत्तम सेवा देण्याचा मानस जनता एजन्सीचे संचालक मारुती मोरे यांनी व्यक्त केला असून, नागरिकांनी या सेवा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.