Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करूनच प्रगती साधता येते - सुदाम पाटील.

आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करूनच प्रगती साधता येते – सुदाम पाटील.

आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करूनच प्रगती साधता येते – सुदाम पाटील.

आजरा.- प्रतिनिधी.

आजच्या धावपळीच्या जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करता येतात. याच्याने मनुष्यबळावरील ताण कमी होऊन, गतिमान आणि कार्यक्षम प्रणाली विकसित करता येते. त्याचा फायदा बँकांनी घेतला, तरच त्यांची प्रगती होईल, असे प्रतिपादन सुदाम पाटील यांनी केले. जनता सहकारी गृहतरण संस्था मर्यादित आजराच्या वतीने आयोजित संचालक-कर्मचारी प्रशिक्षण शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी संस्थेकडे सुरू केल्या जाणाऱ्या सीबीएस प्रणालीची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मारुती मोरे होते.
दुसऱ्या सत्रात सहकार क्षेत्रापुढील आव्हाने या विषयावर बोलताना प्रा. रवींद्र आजगेकर म्हणाले बदलते सहकार कायदे, वाढती स्पर्धा आणि ग्राहकांच्या अपेक्षा यामुळे सहकार क्षेत्रासमोर रोज नवीन आव्हाने येत आहेत. त्यांचा मुकाबला योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.
तिसऱ्या सत्रात व्हाईस चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचुळकर यांनी गृहतारण संस्थाना उज्वल भविष्य काळ असल्याचे सांगितले. आपल्या कडे येणाऱ्या ग्राहकाचे पूर्ण समाधान झाले पाहिजे, त्यांना चांगली आणि तत्पर सेवा दिली पाहिजे, असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक प्राचार्य, डॉ. अशोक सादळे यांनी केले. आभार मैनेजर मधुकर खवरे यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण शिबीरासाठी संस्थेचे मॅनेजर मधुकर खवरे प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व सर्व शाखेचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.