Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रइंधन दरवाढी विरोधात आजरा उबाठा सेनेचा बैलगाडी मोर्चा.इंधन व महागाई दरवाढी विरोधात...

इंधन दरवाढी विरोधात आजरा उबाठा सेनेचा बैलगाडी मोर्चा.इंधन व महागाई दरवाढी विरोधात जोरदार घोषणा व निदर्शने.

इंधन दरवाढी विरोधात आजरा उबाठा सेनेचा बैलगाडी मोर्चा.
इंधन व महागाई दरवाढी विरोधात जोरदार घोषणा व निदर्शने.

आजरा – प्रतिनिधी.

इंधन व महागाई दरवाढीच्या विरोधात आजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढून सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशातील जनतेसाठी काम करत नसून मागील चार – पाच दिवसांमध्ये ३ रु पेट्रोल वाढ व घरगुती गॅस, डिझेल वाढ, सी. एन.ज्ञजी गॅस वाढ करुन सर्व सामान्य माणसांचे आर्थिक नुकसाना बरोबर जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दोन वेळचे अन्न मिळणे मुश्कील झाले आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान व देशातील मंत्री पन्नास साठ गाड्यांचा ताफा घेऊन परदेश दौऱ्याबरोबर राज्याचे दौरे करत आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेला पेट्रोल व डिझेल कमी वापरण्याचे सल्ले देत आहेत. त्याच्या निषेधार्थ शुक्रवार सोमबार दि. २९/०५/२०२६ आजरा शिवसेनेच्या वतीने बैलगाडी घेऊन आजरा येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी सह संपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख समीर चाँद, उप. ता. प्रमुख संजय येसादे, उपसभापती पं स. आजरा सौ. यशोदा पोवार तसेच सागर नाईक, सुनिल डोंगरे, विलास किल्लेदार, दिनेश कांबळे, सुयश पाटील, महेश पाटील युवासेना, बिलीस लतीफ, अमित गुरव, आजरा, चंदगड, गडहिंग्लज उबाठा सेनेचे पदाधिकारी सह महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांनी या इंधन दरवाढीच्या विरोधी मोर्चात सहभाग घेतला.

चौकट

यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, ता. प्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख समीर चाॅद, संजय येसादे, तसेच इंधन दरवाढी विरोध व आंदोलनाला पाठिंबा याबाबत कॉम्रेड शांताराम पाटील, संजय तर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.