Homeकोंकण - ठाणेकै. अमृतरावजी (काका) देसाई पुण्यतिथी. विनम्र अभिवादन.-महाल शिक्षण मंडळ आजरा.

कै. अमृतरावजी (काका) देसाई पुण्यतिथी. विनम्र अभिवादन.-
महाल शिक्षण मंडळ आजरा.

आजरा. प्रतिनिधी. २८

आजरा येथील महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. अमृतरावजी (काका) देसाई यांचा आज दिनांक २८ रोजी ३२ वी पुण्यतिथी, व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा प्रशालेतील संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली यानिमित्त. त्यांच्या तैलचित्राला पुष्पहार घालून आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यानी अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना श्री शिंपी यांनी कै. अमृतराव देसाई यांचा समाजसेवी जीवन प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला. १६ सप्टेंबर १८९९ रोजी त्यांचा जन्म झाला. संस्थानकालीन काळात त्यांनी आजरा शहराचा विकास करत असताना तालुक्यातील गोरगरीब जनता व त्यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून आजरा महाल शिक्षण मंडळाची स्थापना करून व्यंकटराव हायस्कूल प्रशाला सुरू केली व बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाची दारे उघडली तसेच आजरा येथील अनेक सेवा संस्था, राईस मिल, पतसंस्था, त्याच प्रमाणे आजरा शहराच्या विकासाची त्यांनी स्वप्नं पाहिली आणि ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड केली त्यांना यशही आले ‌. आजही त्यांना आजराचे भाग्यविधाते म्हणून ओळखतात.. समाजसेवा हे एकच व्रत हाती घेऊन कार्य करणारे काका त्यावेळी आणि आजही सर्वांच्या मनामनात आहेत.
त्यांचा आज २८ ऑगस्ट स्मृतिदिन…
त्यानंतर माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई यांनी आपले आजोबा (काकां)यांच्या बद्दल आपल्या आठवणी जागृत केल्या आणि त्यांची कडक शिस्त, बोलण्यातील आणि आवाजातील दमदारपणा, गोरगरीब जनतेबद्दलचं प्रेम, शिक्षण आणि शिक्षकांबद्दलचं अपार प्रेम त्यांच्या सान्निध्यात असताना अनुभवयास मिळाली.. अशा अनेक समाजसेवी कार्याची आठवण आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीतून सर्वांना करून दिली.
याप्रसंगी उपाध्यक्ष आण्‍णासो पाटील, सचिव.. एस. पी‌ कांबळे, खजिनदार श्री एस.डी. चव्हाण, संचालक श्री.केशव पाटील, श्री. पांडुरंग जाधव, माजी प्राचार्य व संचालक श्री एस. जी .देसाई, प्राचार्य श्री एस बी गुरव, पर्यवेक्षक श्री एस. जी. खोराटे., व्यंकटराव हायस्कूल व जुनियर कॉलेज आजरा
होते या प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.