Homeकोंकण - ठाणेसातारा जिल्ह्यात 540 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू..

सातारा जिल्ह्यात 540 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू..

कराड दि.28 (प्रतिनिधी)

सातारा जिल्ह्यात काल दि 27 रोजी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनूसार जिल्ह्यात 540 बाधितांची वाढ झाली आहे, कराड तालूक्यात 99 बाधितांची वाढ झाली असून जिल्ह्याचा बाधितांचा आकडा सध्या 2 लाख 38 हजार 189 एवढा झाला आहे, तर आजपर्यंत 2 लाख 25 हजार 618 जण कोरोनामूक्त झाले आहेत, आजपर्यंत 5 हजार 991 जणांचा मृत्यू झाला आहे.काल 15 हजार 419 नमुने घेण्यात आले होते. आज पर्यंत जिल्ह्यात 17 लाख 60 हजार 654 जणांचे नमूने घेण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात 9 हजार 924 अॅक्टीव रूग्ण आहेत.

जिल्ह्यात 540 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू…..

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 540 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली 4 (9795), कराड 99 (37705), खंडाळा 14 (13784), खटाव 83 (24063), कोरेगांव 55 (20877), माण 43 (16721), महाबळेश्वर 2 (4581), पाटण 9 (9918), फलटण 88 (34514), सातारा 105 (48029), वाई 24 (15312) व इतर 14 (1890) असे आज अखेर एकूण 238189 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (215), कराड 2 (1158), खंडाळा 0 (192), खटाव 0 (594), कोरेगांव 0 (455), माण 0 (377), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (365), फलटण 0 (673), सातारा 0 (1438), वाई 0 (358) व इतर 0 (78), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5991 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.