Homeकोंकण - ठाणेमुंबई इंडियन्सचा पराभव - राजस्थानची प्लेऑफमध्ये रॉयल एन्ट्री.. अधिक पहा..👇

मुंबई इंडियन्सचा पराभव – राजस्थानची प्लेऑफमध्ये रॉयल एन्ट्री.. अधिक पहा..👇

मुंबई इंडियन्सचा पराभव – राजस्थानची प्लेऑफमध्ये रॉयल एन्ट्री.. अधिक पहा..👇

मुंबई :- प्रतिनिधी.

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली आहे. मुंबईच्या या पराभवामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. तर राजस्थान रॉयल्सला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे.

प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे 4 सामने होतात. प्लेऑफसाठी राजस्थान आधी गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पात्र ठरली आहे. प्लेऑफ फेरीला क्वालिफायर 1 पासून सुरुवात होणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये असलेल्या संघात क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात येतो. या सामन्यात मंगळवारी 26 मे रोजी आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

त्यानंतर बुधवारी 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्याचा थरार रंगणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या संघांमध्ये हा सामना खेळवण्यात येतो. त्यामुळे या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर शुक्रवारी 29 मे रोजी क्वालिफायर 2 मॅच होईल. क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता यांच्यात हा सामना होणार आहे. हा सामना मुल्लानपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तसेच 31 मे रोजी आयपीएल 2026 स्पर्धेचा विजेता संघ निश्चित होईल. क्वालिफायर 1 मधील विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 सामन्यातील यशस्वी संघ यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.