इंधन दरवाढी विरोधात आजरा काँग्रेसच्या वतीने निदर्शने.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा काँग्रेस वतीने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा इंधन दरवाढी बाबत. देशात सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या महागाईचा तीव्र निषेध नोंदवण्या करिता आम. सतेज (बंटी) पाटील नेतृत्वात संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन करण्याचे निश्चीत झाल्याने, आज आजरा तालुका कॉग्रेसच्या वतीने आजरा येथील मिनर्वा पेट्रोल पंप येथे तीव्र निदर्शने केली.
वाढत्या इंधन दरामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली असून, याचा थेट फटका शेतकरी, कामकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या बजेटला बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या आंदोलनातील खालील मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले. यामध्ये थेट पेट्रोल पंपावर नागरिकांना पत्रक वाटून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. वाढत्या इंधनामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल-डिझेलचे दर तात्काळ कमी करा’, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये आजरा नगरपंचायतचे गटनेते अभिषेक शिंपी, नगरसेवक असिफ पटेल, निसार लाडजी, असिफ सोनेखान, विक्रम पटेकर, तसेच सामाजीक कार्यकर्ते इब्राहीम इंचनाळकर, अमित खेडेकर, सुफियान खेडेकर, मुज्जमिल खेडेकर तसेच कॉग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
