Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमहिलेचे १५ तोळे सोन्याचे दागीणे व एक लाख रुपये रक्कम असलेली बॅग...

महिलेचे १५ तोळे सोन्याचे दागीणे व एक लाख रुपये रक्कम असलेली बॅग मिळाली परत – आजरा पोलिसांना यश.‌

महिलेचे १५ तोळे सोन्याचे दागीणे व एक लाख रुपये रक्कम असलेली बॅग मिळाली परत – आजरा पोलिसांना यश.‌

आजरा.- प्रतिनिधी.

महिलेचे १५ तोळे सोन्याचे दागीणे व एक लाख रुपये रक्कम असलेली बॅग मिळाली परत करण्यात आले. यामध्ये आजरा पोलिसांना यश दि. 10/05/2026 रोजी धनाजी बाबुराव कांबळे व त्यांच्या पत्नी सौ. संगीता धनाजी कांबळे रा. पेरणोली ता. आजरा जि. कोल्हापूर या मुंबई येथे राहणेस असुन त्या आज रोजी त्यांचे मुळ गांवी पेरणोली ता. आजरा येथे येत असताना खाजगी ट्रॅव्हल्स मधुन आजरा येथे सकाळी 07.00 वाजता उतरले. ते घरी गेलेनंतर त्यांच्या एकुण सहा बॅगांपैकी एक बॅग मिळुन आली नाही. त्या बॅगमध्ये त्यांचे एकुण पंधरा तोळे वजनाचे दागीणे, एक लाख रुपये रोख रक्कम तसेच इतर मौल्यावन वस्तु असलेने त्या घाबरलेल्या अवस्थेत आजरा पोलीस ठाणे येथे आल्या. त्यांचेकडे चौकशी करुन त्यांची तक्रार नोंदवित असतानाच त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार व त्यांनी वर्णन केलेला खाजगी ट्रॅव्हल्सचा गाडी नंबर, प्रवासाची वेळ, गाडीतुन उतरलेले ठिकाण, बॅगचे वर्णन याची संपूर्ण माहिती घेवुन सपोनि शितलकुमार डोईजड यांनी आजरा पोलीस ठाणे येथे तपासाकामी आलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार ब.नं 1172 समीर कांबळे व आजरा पोलीस ठाणेकडील पोकों 2279 वैभव गवळी यांना सदर ठिकाणी तात्काळ पाठविले. सदरचे ठिकाण हे आजरा शहरातील मुख्य चौक असुन रहदारीचा परिसर आहे. सदर ठिकाणचे परिसरातील सी. सी. टी. व्ही ची पाहणी करुन बॅगेचा शोध घेत असताना, जवळच असले दुकाणाचे बाहेर बेवारस अवस्थेत मिळुन आली. त्यावेळी सदरचा प्रकार चोरीचा नसलेची खात्री झाली. सदरची बॅग तात्काळ हस्तगत केलेने सदर महिलेचे एकुण पंधरा तोळे सोन्याचे दागीणे, बॅगेत असलेले एक लाख रुपये तसेच इतर मौल्यवान वस्तु खात्री करुन सुखरुप त्यांचे ताबेत देण्यात आले आहे. त्यावेळी सदरची महिला भावुक झाली होती. स्थानिक गुन्हे शाखा व आजरा पोलीस ठाणे यांनी केलेल्या कामगीरीमुळे आजरा येथील ग्रामस्थ, व्यापारी यांनी कोल्हापूर पोलीसांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. सदरची कामगिरी निलोत्पल बसु, मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर, श्री आण्णासाहेब जाधव, अपर पोलीस अधीक्षकसाो गडहिंग्लज कॅम्प इंचलकरजी, आण्णासो पवार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, शाहूवाडी, श्री. सुशांत चव्हाण पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापर, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, आजरा पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, आजरा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर, अंमलदार समीर कांबळे, सतिष जंगम व आजरा पोलीस ठाणेकडील अंमलदार अनिल सरंबळे, वैभव गवळी, दिपाली खडके, यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.