🟣 चळवळीत नेत्रदानाचे दीड शतक.- गिजवणेत दुसरे नेत्रदान : पोवार कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी.
🟣 मलिग्रे भावेश्वरी देवी मंदिर वास्तूकशांती सोहळा उत्साहात संपन्न.
🌹श्रीमती जनाबाई दत्तु निऊगरे. मडिलगे यांचे दुःखद निधन.
🌹विलास रामचंद्र आरळगुंडकर. मडिलगे यांचे दुःखद निधन.
🟣 चळवळीत नेत्रदानाचे दीड शतक.- गिजवणेत दुसरे नेत्रदान : पोवार कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

गडहिंग्लज, आजरा तालुक्यात गेल्या साडेतेरा वर्षांपासून सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीत आज १५० वे नेत्रदान झाले. गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील मारुती भिमराव पोवार (वय ६८) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. गिजवणे गावातील हे दुसरे नेत्रदान आहे. २९ ऑक्टोबर २०१२ रोजी नेत्रदान चळवळीची सुरुवात झाली. चळवळीच्या प्रारंभानंतर २४ तासातच पहिले नेत्रदान झाले होते. गेल्या तेरा वर्षात २७ गावातून १५० व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. १५० हा केवळ आकडा नाही तर या माध्यमातून जनमानसात नेत्रदानाबाबत सजगता निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. गिजवणे गावात मधुकर मुळे यांचे पहिले मरणोत्तर नेत्रदान झाले होते. तीन वर्षानंतर मारुती पवार यांच्या झालेल्या नेत्रदानामुळे गिजवणे गावात चळवळीला नव्याने गती मिळाली आहे. मारुती पोवार पाटबंधारे विभागातून निवृत्त झाले होते. जोतिबा पोवार व नारायण पोवार यांचे ते वडील होत.

🟣 मलिग्रे भावेश्वरी देवी मंदिर वास्तूकशांती सोहळा उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

मलिग्रे गावचे आराध्य दैवत भावेश्वरी देवीच्या मंदिर वास्तूकशांती सोहळा गुरूवार दिनांक ७ मे पासून प्रांरभ झाला असून शुक्रवारी ८ मे रोजी कलस मिरवणूक व मुर्ती मिरवणूकीत माहेर वाशीनी महिलासह संपूर्ण गावातील अबाल वृध मोठ्यासंख्यने सामिल झाल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे.
गावच्या मध्ये भागी असणार्या चाळोबा, रवळनाथ मंदिराचा वीस वर्षा पुर्वी जिर्णोध्दार झाला असून त्या मंदिरा जवळ असणार्या भावेश्वरी मंदिराचा जिर्णोध्दार देणगीदार व लोक सहभागातून आकर्षक असे मंदिर बांधकाम झाले आहे. या वास्तूंशांती सोहळ्यात गावातील महिलावर्ग कलश घेऊन तर माहेरवाशीनी डुरड्याची भेट घेऊन सहभागी झाल्या आहेत.
शनिवारी प्रधान देवता मुर्ती स्थापना व रविवारी महाप्रसादाचे नियोजन केले आहे. यासाठी सोंगी भजन व विविध कलागुणाचा सास्कृतीक कार्यक्रम तर युवावर्गाने आणि मुंबई ग्रामस्थ वतीने किक्रेट सामन्याचे आयोजन केले आहे.
💥भावपूर्ण श्रद्धांजली.
🌹श्रीमती जनाबाई दत्तु निऊगरे यांचे दुःखद निधन.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील श्रीमती जनाबाई दत्तु निऊगरे वय वर्षे ७२ यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा एक मुलगी सुना नाती असा परिवार आहे.
त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी ता. अध्यक्ष अनिल निऊगरे त्यांच्या आई होत.
🌹विलास रामचंद्र आरळगुंडकर यांचे दुःखद निधन.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील विलास रामचंद्र आरळगुंडकर वय वर्ष ५९ यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा दोन मुली सुन, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच गणपतराव आरळगुंडकर यांचे पुतणे होत.
