Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशक्तीपीठ महामार्गच्या संयुक्त मोजणीला ठाम विरोध.( गाव शिवारात पाय ठेवू न देण्याचा...

शक्तीपीठ महामार्गच्या संयुक्त मोजणीला ठाम विरोध.( गाव शिवारात पाय ठेवू न देण्याचा बाधित शेतकऱ्यांचा निर्धार.)🟣आरोग्य व बांधकाम समिती सभापती जि. प. कोल्हापूर यांची आजरा प्रा. आरोग्य केंद्रांना भेट.

🛑शक्तीपीठ महामार्गच्या संयुक्त मोजणीला ठाम विरोध.
( गाव शिवारात पाय ठेवू न देण्याचा बाधित शेतकऱ्यांचा निर्धार.)
🟣आरोग्य व बांधकाम समिती सभापती जि. प. कोल्हापूर यांची आजरा प्रा. आरोग्य केंद्रांना भेट.

🛑शक्तीपीठ महामार्गच्या संयुक्त मोजणीला ठाम विरोध.
( गाव शिवारात पाय ठेवू न देण्याचा बाधित शेतकऱ्यांचा निर्धार.)

आजरा – प्रतिनिधी.

शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित अरेखनाला पाच मे रोजी अंतिम मान्यता देऊन महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. या आधारे येत्या काही दिवसात संयुक्त मोजणी सुरू करण्याची करणार असल्याची हालचाल प्रशासनाच्या स्तरावर सुरू असल्याची कुणकुण लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज आजरा येथे तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यालयात पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थानी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई होते. बैठकीचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले की राज्य सरकारने अंतिम अधिसूचना 5 मे रोजी जाहीर केले असून त्याच्या आधारे शेतकऱ्यांना बेसावध ठेवून संयुक्त मोजणी करण्याच्या घाट सरकारने आखला आहे संयुक्त मोजणी करण्याची हालचाल प्रशासनाच्या स्तरावर सुरू असल्याचे समजते. त्यामुळं शक्तीपीठचे हे संकट शेतकऱ्यांच्या गाव शिवारात आले आहे. १५ तारखेपर्यंत संयुक्त मोजणी करून अहवाल शासनाला देण्याचे आदेश महसूल विभागाला आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आज ही तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त मोजणी पथकाला गावात किंवा शिवारात फिरू द्यायचे नाही काही झाले तरी शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी आता तय्यार राहावे.
यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, आपण आता ढिले पडता कामा नये. काही झाले तरी संयुक्त मोजणी करू द्यायची नाही त्यासाठी तीव्र विरोध करूया असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील संयुक्त मोजणी पथकाला गाव शिवारात फिरकू देणार नाही. यावेळी युवराज पोवार, युवराज जाधव, नामदेव गुरव, कॉ शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, चंद्रकांत जाधव, संजय घाडगे, शंकर हाळवणकर, दिनेश कांबळे, महादेव गुरव, दिगंबर पाटील, सुभाष देसाई, संजय देसाई, प्रकाश दोरुगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठया उपस्थित होते.

चौकट.

सोमवारी शक्तीपीठ बाधित शेतकरी आजरा पंचायत समिती येथे मोठ्या संख्येने जमून तहसीलदार आजरा यांना शक्तीपीठच्या संयुक्त मोजनिसह या महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे निवेदन देणार आहेत.

🟣आरोग्य व बांधकाम समिती सभापती जि. प. कोल्हापूर यांची आजरा प्रा. आरोग्य केंद्रांना भेट.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आरोग्य उपकेंद्रांना सौ सारिका नांदेकर
सभापती आरोग्य व बांधकाम समिती जि. प. कोल्हापूर
यांचा आजरा तालुका दौऱ्या दरम्यान प्रा. आ. केंद्र भादवण प्रा. आ. केंद्र उत्तूर तालुका आजरा येथे भेट देऊन प्रा.आ.केंद्राच्या कामा बद्दल आढावा घेतला. प्रा.आ.केंद्रा मधील कामा बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच “माझ गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियानात सर्व ग्रामपंचायत यांनी सहभाग घ्यावा. याबद्दल त्यांनी सर्वांना आवाहन केले. HPV लसीकरण घेण्यासाठी जनजागृती करण्यात यावी अश्या सूचना त्यांनी दिल्या. पालकांमध्ये HPV लसीकरणाबद्दल गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी पालकांना प्रत्यक्ष भेटून अथवा पालक सभा घेऊन गैरसमज दूर करण्यात यावेत असे त्यांनी आरोग्य कर्मचारी यांना सूचना दिल्या. तसेच पंचायत समिती आजरा सभागृह येथे सौ. नांदेकर यांचे स्वागत सभापती जयश्री गाडे यांनी केले. यावेळी सौ. नांदेकर यांनी आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग यांचा आढावा घेतला. डॉ. आर. जी. गुरव ता. आरोग्य अधिकारी पंचायत समिती आजरा यांनी आरोग्य विभागाचा आढावा दिला. तालुक्यातील कामाबद्दल सौ.नांदेकर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पुढे पण असेच चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी जि प सदस्य शिरीष देसाई, पं. स.सदस्य, विकास चोथे, समीर पारधे, अनिरुद्ध पिंपळे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.कोल्हापूर, डॉ. रवींद्र गुरव तालुका आरोग्य अधिकारी, श्री शेटे सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा श्री.नांदेकर सरपंच ग्रामपंचायत उत्तूर श्री आमणगी, जी.एम.पाटील सरपंच ग्रामपंचायत देवर्डे, जि.प.कोल्हापूर आरोग्य विभाग कडील सुपरवायझर तसेच प्रा.आ.केंद्र कडील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका,आशा गटप्रवर्तक,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडील सर्व अधिकारी आणि कर्मचारी, बांधकाम विभाग कडील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच पंचायत समिती आजरा कडील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.