गडहिंग्लज, हलकर्णी इब्राहीमपूर, गवसे मार्गाच्या कामाच्या दिरंगाईबाबत बैठक बोलवा.- आजरा उबाठा सेनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
गडहिंग्लज, हलकर्णी इब्राहीमपूर, गवसे मार्गाच्या कामच्या संदर्भात बैठक
लावणेबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेली वर्षभर गडहिंग्लज हलकर्णी इब्राहिमपूर गवसे मार्गाचे काम चालू आहे. या मार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ठ आहे त्याच बरोबर बऱ्याच ठिकाणी वळण काढणे गरजेचे होते ती वळणे काढलेली नाहीत ज्या ठिकाणी रस्ता करायचा आहे त्या जुन्या रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे पडलेले आहेत या खड्यामुळे अनेक अपघात होत आहेत सध्या यात्रा लग्न समारंभ चालू असलेने वाहतूक वाढलेली आहे त्यातच आता पाऊस चालू होईल त्याआधी या रस्त्याची डागडूजी होणे गरजेचे आहे काही ठिकाणी मोहऱ्या बांधणेसाठी उकरून ठेवलेले आहेत. हि कामे अजूनही पूर्ण झालेले नाहीत. अशा अनेक विषयावर चर्चा करणेसाठी उपविभागीय अधिकारी आजरा भुदरगड यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या दालनात तत्काळ बैठक लावावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार, उप ता. प्रमुख संजय येसादे, तसेच अमित गुरव, सुयश पाटील, हरिचंद्र व्हरकटे, महादेव गुरव सह पदाधिकारी शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.



