दहावी, बारावीचा निकाल लागणार या तारखेला ( १७ मे पासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरू होणार.) अधिक पहा.👇👇
पुणेः- प्रतिनिधी
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात पार पडली. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता ५ मेपर्यंत बारावीचा आणि १५ मेपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती समोर आली आहे.
दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेकजण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात. पण, आता असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे एकाच पानावर मिळणार आहे. त्यावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे. याशिवाय त्यावर क्युआर कोड देखील असणार आहे. तो क्युआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती समजणार आहे. पहिल्यांदाच बोर्डाने हा बदल केला असून त्यातून बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे.
दरम्यान, आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरु असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर साधारणतः एक महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.
चौकट.
गतवर्षीपासून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवली जात आहे. सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन अनेक विद्यार्थी कॉलेजला केवळ परीक्षेला जातात आणि वर्षभर कोचिंग क्लासला हजेरी लावतात. असे गैरप्रकार बंद व्हावेत, कागदावरील आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी यात तफावत राहू नये हा त्यामागील हेतू आहे. यंदा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १७ मे पासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु होणार आहे. ऑनलाइन गुणपत्रिकेवरून विद्यार्थ्यांना सुरवातीला महाविद्यालयांचे
