Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्ताने - यावर्षीचे वारकरी कीर्तन संमेलन. ( समस्त वारकरी...

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्ताने – यावर्षीचे वारकरी कीर्तन संमेलन.[ दि २५ रोजी – भैरवनाथ मंदिर शेळप ता. आजरा येथे ] ( समस्त वारकरी संप्रदाय ता. आजरा. )

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्ताने – यावर्षीचे वारकरी कीर्तन संमेलन.
[ दि २५ रोजी – भैरवनाथ मंदिर शेळप ता. आजरा येथे ] ( समस्त वारकरी संप्रदाय ता. आजरा. )

आजरा.- प्रतिनिधी.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज व समस्त आजरा तालुका वारकरी संप्रदाय आयोजित वारकरी कीर्तन संमेलन दि. २५/४/२०२६ रोजी भैरवनाथ मंदिर शेळप ता. आजरा या ठिकाणी होणार असल्याचे सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली.
स्वागत व प्रस्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी केले. यावेळी बोलताना प्रा.‌ शिंत्रे म्हणाले
मागील चार वर्षापासून आजरा, गडहिंग्लज, चंदगड या तीनही तालुक्यात वारकरी कीर्तन संमेलन आज संपन्न होतात २०२६ सालातील पाचवे किर्तन संमेलन संपन्न होणार आहे.
या कीर्तन सोहळ्यासाठी प्रवचनकार दैनिक तरुण भारत कोल्हापूर संपादक ह. भ. प. श्रीरंग गायकवाड, ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज सांगोला पंढरपूर असणार आहेत.
तालुक्यातील विविध गावातून दिंड्या येणार असून या कीर्तन संमेलनाचे ध्वजपूजन ग्रंथ पूजन गाथा पूजन सोहळा सकाळी १० वा. १०.३० वा. व्यासपीठ पूजन श्रीमंती अंजनाताई रेडेकर तसेच ११ वा. ह भ प श्री गायकवाड यांचे व्याख्यान.
दुपारी १ ते २ पंर्यत समस्त आजरा तालुका हरिपाठ सामुदायिक मंडळ तर २.३० ते ३ वारकरी सन्मान सोहळा
सायं ३ ते ५ ह भ प श्री बंडगर महाराज यांचे कीर्तन
हरिपाठ मंडळ भैरवनाथ महिला वारकरी मंडळ शेळप ( संयोजक समिती.) सरपंच अर्जुन बागडी, तसेच संभाजी पाटील, नवनाथ शिंदे संदेश कुंभार, संतू पाटील श्रीकांत परब, शिवाजी आडाव संदीप नवार, दिनेश कांबळे, पांडुरंग पाटील, विजय पाटील, उज्वला पाटील, अंकुश कांबळे, गीता देसाई, श्रीकांत नार्वेकर, सदानंद पाटील, भिकाजी पाटील, श्रावण वाकर व काशिनाथ मोरे
या संमेलनाचे संयोजक आहेत. तर संमेलनाचे सत्कारमूर्ती राम कृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्था आजरा ह. भ. प. अध्यक्ष गौरव सुतार, तसेच पांडुरंग जोशीलकर गंगाराम येडगे, लक्ष्मण शिंत्रे, संतु कांबळे, बाबू घुरे, बाबुराव आडे, बाळासाहेब सुतार, राजाराम जाधव, सूर्यकांत गुरव, गोपाळ दारुटे, विश्राम निऊगरे, शंकर तेजम, संतू पाटील, महादेव सुतार, नामदेव सुतार, पांडुरंग पाटील, उत्तम सुतार, सचिन तपकिरे, अशोक पाटील, रामचंद्र भादवणकर मधुकर, जाधव, सौ.कलावती गुरव, कल्पना जाधव, भारती धडाम, श्रीमंती रेखाताई बटकली, सौ संगीता जाधव, कृष्णा पाटील, धोंडीबा सावंत, कृष्णा तेजम, रमेश पाटील, वसंत चाळके, ज्ञानेश्वर गावडे, भाऊ निर्मळे असे सत्कारमूर्ती आहेत.
तरी या पाचव्या वर्षाचे होणारे वारकरी कीर्तन संमेलनाला आजरा तालुक्यातील वारकरी मंडळी सह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज व समस्त आजरा ता. वारकरी संप्रदाय मंडळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.