Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यात भिंत कोसळून विद्यार्थी व शिक्षिकेचा मृत्यू. - एक जखमी- आजरा पोलिसात...

आजऱ्यात भिंत कोसळून विद्यार्थी व शिक्षिकेचा मृत्यू. – एक जखमी- आजरा पोलिसात गुन्हा दाखल.

आजऱ्यात भिंत कोसळून विद्यार्थी व शिक्षिकेचा मृत्यू. – एक जखमी- आजरा पोलिसात गुन्हा दाखल.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहराच्या महागाव रोडवरील सी. डी. फार्म, जनावरांचा बाजार नजिक असलेल्या देशपांडे यांच्या जुन्या घराची भिंत जेसीबीने पाडत असताना. रस्त्यावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व शिक्षका यांच्या अंगावर पडल्याने या भिंतीच्या खाली एक विद्यार्थी व शिक्षिका यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये कु. वैष्णवी तुकाराम भोसले (वय : १४ वर्षे) व प्रा. ज्योती नितीन कुंभार (वय : ४२ वर्षे) या ठार झाल्या. तर ललिता तुकाराम भोसले (वय : ४५ वर्षे) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबतची माहिती आजरा शहरात समजतात घटनास्थळी नगराध्यक्ष अशोक चराटी, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल पाटील, आजरा पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलिस कर्मचारी सर्व नगरसेवकांनी भेट दिली. आजरा शहरातील नागरिकांनी जखमींना व घडलेली घटना पाहण्यासाठी गर्दी केली होती. ग्रामीण रुग्णालय आजरा या ठिकाणी यातील काही ढिगार्‍याखाली सापडलेल्या व्यक्तींना नेण्यात आलं होतं. या ठिकाणी मृत्यू घोषित केले असल्याचे समजते.

याबाबतची फिर्याद सुनिल पांडुरंग कुंभार वय 50 वर्षे यांनी आजरा पोलिसात दिली आहे. यातील हाकीगत डॉ. अनिल माधवराव देशपांडे यांचे जुने घर हे पाडण्याचे काम आरोपी कॉन्ट्रॅक्टर अभिजीत बाबुराव हुक्केरी यांना दिले होते, तेच काम अभिजीत हुक्केरी यानी सब कॉन्ट्रॅक्टर आरोपी विनोद मोहीते यास दिले, आरोपी विनोद पांडुरंग मोहीते यांनी घर पाडत असताना घराशेजारील रस्त्यावरुन येणा-या जाणा-या एखादया व्यक्तीचा
जीव जावू शकतो हि माहिती असूनही त्यांनी कोणतीही सुरक्षीततेची उपाययोजना न करता जे सी बी क्र. एम एच 09 जी एम 6689 च्या सहाय्याने घर पाडतेवेळी ज्योती नितीन कुंभार, कु. वैष्णवी तुकाराम भोसले 14 श्रीमती. ललीता तुकाराम भोसले वर 31 ह्या घराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरुन चालत जात असताना त्यांचे व इतरांचे जिवीतास धोका होईल हे माहीती असताना देखील निष्काळजीपणे, हयगयीने, परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यंाच्या जिवाची पर्वा न करता भिंत पाडल्याने मातीच्या ढिगा-याखाली सापडून ज्योती नितीन कुंभार, कु. वैष्णवी तुकाराम भोसले हया मयत झाल्याने व श्रीमती. ललीता तुकाराम भोसले हया गंभीर जखमी झालेबाबत यातील दिलेल्या फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन आरोपी कॉन्ट्रॅक्टर अभिजीत बाबुराव हुक्केरी, रा. आजरा, विनोद पांडुरंग मोहीते, रा. आजरा व जे. सी. बी चालक मिथुन चव्हाण, वय. 20 वर्षे, रा. विजापूर, रा. कर्नाटक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे अधिक तपास सपोनि तपास पोसई युवराज धोंडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.