Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा - वेळवट्टी येथे विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न.

आजरा – वेळवट्टी येथे विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न.

आजरा – वेळवट्टी येथे विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न.

आजरा ‌- प्रतिनिधी.

वेळवट्टी येथे विठ्ठल रुक्माई मंदिर जिर्णोद्धारासाठी नाम. आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून १० लाख रुपये निधीचा उदघाटन सोहळा जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडला.
यावेळी स्वागत व प्रास्तावीकात ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत देसाई यांनी नाम. प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या अंदाजे २ कोटी १२ लाख रुपये विकासकामांची तसेच भविष्यातील नियोजित विकासकामांची माहिती दिली अध्यक्षीय भाषनातं अर्जुन आबिटकर सर यांनी भविष्यात देखील निधीची कमतरता भासू देणार नाही तसेच नाम. आरोग्यमंत्री यांचे या गावावरील प्रेम सदैव असेच राहील असे आश्वस्थ केले.  रुपचंद्र गावडे यांनी आपल्या मनोगतात वारकरी सांप्रदाय चा आढावा दिला जितेंद्र पोवार यांनी आभार मानले यावेळी उपस्थित वारकरी सांप्रदाईक मंडळ अध्यक्ष मधुकर गावडे व इतर मान्यवरांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
या वेळी शिवसेना शहर प्रमुख विजय थोरावत, साळगाव सरपंच  धनंजय पाटील, संतोष भाटले, काकासो देसाई, शनिल महागावकर, सरपंच मारुती पोवार, ग्रामपंचायत सदस्य शामराव पोवार, सुनंदा कुंभार, रेश्मा गावडे, मनीषा देसाई इंजि. अनिकेत शिंत्रे यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.