नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्यांनी विकास कामाच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करावा.- श्रीमती अंजनाताई रेडकर गोकुळ संचालिका.
आजरा.- प्रतिनिधी.

नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व विकास कामाच्या माध्यमातून आपल्या मतदार संघाचा कायापालट करावा असे प्रतिपादन गोकुळ च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले. त्या प्रेद्रेवाडी येथील केदारी रेडेकर हायस्कूलच्या पटांगणात झालेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. पेद्रेवाडी ग्रामस्थ, व्ही. के. चव्हाण पाटील पतसंस्था, महात्मा फुले दूध संस्था, कमळाबाई रेडेकर दूध संस्था, केदारी रेडेकर हायस्कूल, केदारी रेडेकर वाचनालच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी किरण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर नुल जिल्हा परिषद सदस्य पदी निवडून आल्याबद्दल अनिरुध्द रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सौ. जयश्री गाडे, उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल सौ. यशोदा पोवार, पचायंत समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल समिर पारदे यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईच्या माझी नगरसेविका वत्सला जाधव यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जनतेने निवडून देवून काम करण्याची संधी दिली आहे. त्या संधीचे विकास कामाच्या माध्यमातून सोने करावे. असे आवाहन केले. यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना श्री रेडेकर म्हणाले, पेद्रेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या या सत्कारामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपण केलेल्या या सत्कारामुळे आमच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. आपण टाकलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. नूल जिल्हा परिषद मतदार बरोबरच आजरा तालुक्याच्या विकास कामांमध्ये भरिव योगदान देणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी समिर पारदे, युवराज पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रविंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले व विश्वास येजरे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाला गजानन गाडे, शिवाजी गिलबिले, संजय येसादे, आनंदराव बुगडे, राजू पाटील, भाउसाहेब किल्लेदार, सुधीर पाटील, उत्तम होडगे, रविंद्र चव्हाण, धनाजी डोंगरे, बबन कातकर, रामचंद्र डोंगरे, यांचा सह गावातील विविध संस्थाचे पदधिकरी, तालुक्याती विविध संस्थांचे पदाधिकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
