मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत समाविष्ट – करुन राजपुताना प्रदेश मराठा प्रभावक्षेत्रात दाखवा.- मराठा महासंघाचे तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत समाविष्ट करून त्यामध्ये राजपुताना प्रदेश मराठा प्रभावक्षेत्रात दाखवण्याबाबत
याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा आजरा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. NCERT च्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पूर्वी समाविष्ट असलेला मराठा साम्राज्याचा नकाशा अलीकडील आवृत्यांमध्ये वगळण्यात आलेला आहे. हा नकाशा पुन्हा समाविष्ट करून, त्यामध्ये राजपुताना (राजस्थान) हा मराठा साम्राज्याच्या प्रभावक्षेत्रात दाखवावा,
यासंदर्भात खालील ऐतिहासिक पुरावे निदर्शनास आणून दिलेले आहेत. यामध्ये
१). मराठा मारवाड संबंध (१७२४-१८४३) या ग्रंथामध्ये राजस्थान हिंदी ग्रंथ अकादमी, जयपूर यांनी प्रकाशित केलेल्या दस्तऐवजांमध्ये मराठा आणि राजपूत राज्यांमधील संबंध स्पष्टपणे नोंदलेले आहेत. या पत्रांमध्ये मराठा सरदारांकडे मदत, संरक्षण व सैन्य पाठवण्याच्या विनंत्या करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते
२) संबंधित पत्रव्यवहारामध्ये विविध राजपूत शासकांनी मराठा सरदारांना (उदा. विसाजी पंत बिनीवाले) थेट विनंती करून सैन्य मदत मागितल्याचे उल्लेख आहेत. यावरून त्या प्रदेशावर मराठ्यांचा प्रभाव व राजकीय वर्चस्व होते, हे सिद्ध होते.
३) १७५२ च्या करारानंतर मुघल बादशहा मराठ्यांच्या संरक्षणाखाली गेला होता. परिणामी, मुघलांचे मांडलिक असलेले अनेक राजपूत शासक अप्रत्यक्षपणे मराठा सतेखाली आले होते, असा इतिहासकारांचा सर्वमान्य निष्कर्ष आहे.
४) विविध ऐतिहासिक कागदपत्रांनुसार मराठ्यांनी राजस्थानातील प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल केली. ही बाब त्यांच्या प्रभावी राजकीय अधिकाराचे द्योतक आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता, मराठा साम्राज्याचा नकाशा हा केवळ भौगोलिक सीमांचा नसून प्रभावक्षेत्र (Sphere of Influence) दर्शवणारा आहे. त्यामुळे राजपुताना प्रदेश मराठा प्रभावक्षेत्रात दाखवणे है ऐतिहासिकदृष्ट्या योग्य व आवश्यक आहे.
यासाठी मराठा सामाज्याचा नकाशा पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा,
संबंधित नकाशामध्ये राजपुताना प्रदेश मराठा प्रभावक्षेत्र म्हणून दाखवावा,
यासंदर्भात इतिहासतज्ज्ञांची समिती नेमून योग्य शास्त्रीय पडताळणी करून निर्णय घ्यावा, आपण या निवेदनाचा सकारात्मक विचार करप्न विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ व पुराव्याधारित इतिहास
उपलब्ध करून दयाल, ही अपेक्षा आहे. असे आजरा
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन राज्यातील सर्व तहसील कार्यालयात
केंद्रीय कार्यकारीणी अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या आदेशाने देण्यात आली आहे या नियोजनावर. जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, ता. अध्यक्ष ता. उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
