Homeकोंकण - ठाणेआमली पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई चुकीच्या मार्गावर - गांजा मुक्त आजरा तालुका...

आमली पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई चुकीच्या मार्गावर – गांजा मुक्त आजरा तालुका करा.- आजरा पोलीस स्टेशनला नगरसेवकांचे निवेदन.

आमली पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई चुकीच्या मार्गावर – गांजा मुक्त आजरा तालुका करा.- आजरा पोलीस स्टेशनला नगरसेवकांचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील तरुणांमध्ये वाढत असलेल्या बेशिस्त प्रकारांवर तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावावर आळा घालण्याबाबत आजरा शहरातील नगरसेवक यांनी आजरा पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा शहराची सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील परंपरा आजतागायत आदर्श व वाखणण्याजोगी राहिलेली आहे. तथापि, मागिल आठवड्यात शहरामध्ये घडलेली अत्यंत दुर्दवी घटना किरकोळ वादातून दोन जीवलग मित्रामध्ये झालेला खुन ही संपूर्ण शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे.
सदर घटनेच्या पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली असून, शहरात व तालुक्यात आमली पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाला लागण्याचा धोका बळावत आहे. आमली पदार्थाचे सेवन व त्याची अवैद्य विक्री ही केवळ कायद्याच्या दृष्टीने गुन्हा नसून समाजाच्या आरोग्याला व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारी बाब आहे. त्या अनुषंगाने, आपणास नम्र विनंती करणेत येते की,

आजरा शहर व तालुक्यात अमली पदार्थाच्या विक्री व वितरणावर कठोर कारवाई करणेत यावी. अशा अवैद्य कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांचा शोध घेऊन त्याचा बिमोड करणेत यावा. तरुणांमध्ये जनजागृती करुन त्यांना अशा व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविणेत यावी. शहरात कायदा व सुव्यवस्था अभाधित राखणेसाठी आवश्यक ती प्रतिबंधनात्मक उपाययोजना करणेत याव्यात आपण या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आहे. कळावे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर नगरसेवक, अभिषेक शिंपी आसिफ पटेल, निसार लाडजी, रेश्मा बुट्टेखान, विक्रम पटेकर, श्रीमती कलाबाई कांबळे, परशुराम बामणे, स्मिता कुंभार (परळकर) आसिफ सोनेखान
सह पदाधिकारी यांच्यासह आहेत.
नाम. प्रकाश अबिटकर पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा जिल्हा पोलीस अधिक्षकसो।, कोल्हापूर, पोलीस उपअधिक्षकसो, गडहिंग्लज यांना सदर निवेदनाच्या प्रती पाठवण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.