पी.एम. श्री.उर्दू मराठी विद्यामंदिर आजरा.- प्रज्ञाशोध परीक्षेत – विद्यार्थ्यांचे सुयश
( कु. बरीरा समीर खेडेकर जिल्ह्यात प्रथम.)
आजरा.- प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्हा परिषद आयोजित केलेल्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा २०२५/२६ मध्ये पी. एम. श्री उर्दू मराठी विद्यामंदिर, आजरा या शाळेची विद्यार्थिनी
कु. बरीरा समीर खेडेकर हिने 300 पैकी 236 गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक व कु.जिया इम्रान लमतुरे हिने ३०० पैकी २०६ गुण मिळवून चार तालुक्यात तृतीय क्रमांक ( आजरा, गड, कागल, चंदगड ) मिळवून शाळेचे, पालकांचे आणि आजरा परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
अन्य गुणवंत विद्यार्थी.
कु. सिदरा नईम मुराद.
कु. निदा अमीन बेपारी.
कु. फिजा मुझम्मील लमतूरे.
कु. मुफिजा मुजीब मुराद. कु. सारा सद्दाम नेसरीकर.
कु. आयेशा अनिस नाईकवाडे, कु. म.अर्श म.रसूल दिडबाग, कु.रेहान इसाक शेख.
या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
मार्गदर्शक शिक्षक. रिजवान अमानुल्ला माणगावकर
विद्यार्थीना प्रेरणा:-
बसवराज गुरव. ( गट शिक्षण अधिकारी आजरा ) हाजी.रियाज चौगले ( विस्तार अधिकारी जि. प.कोल्हापूर ) .रावसाहेब देसाई (केंद्र प्रमुख आजरा) युनूस म.हुसेन लाडजी ( मुख्याध्यापक उर्दू मराठी विद्यामंदिर आजरा) विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! अशीच उज्ज्वल कामगिरी करत भविष्यात मोठे यश संपादन करो, हीच सदिच्छा. शाळा व्यवस्थपन समिती पी. एम. श्री उर्दू मराठी विद्यामंदिर, आजरा
वतीने हार्दिक अभिनंदन!
