औद्योगिक वसाहतीसाठी नारायण बाग या जागेचे संपादन करण्यात येवू नये.- उबाठा जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील नारायण बाग येथील जमीन औद्योगीकरण वसाहतीसाठी विस्तारीकरण होणार आहे. याबाबत सदर जागा वगळता अन्य जागा उपलब्ध करावी याबाबत तहसीलदार यांना शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निवेदन देऊन पत्रकार परिषद घेण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक ता. प्रमुख युवराज पोवार यांनी केले. याबाबत जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी
आजरा जिल्हा कोल्हापूर येथे असलेल्या औद्यागिक वसाहतीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विस्तार करण्याची मागणी योग्य आहेच. कारण नवे नवे उद्योग सुरू करण्यासाठी सद्यस्थितीत बसाहतीत जागा उपलब्ध नाही उद्योजकांच्या मागणीनुसार विस्तारीकरण होणार आहे. ही गोष्ट आवश्यकच परंतु विस्तारीकरणामध्ये आजरा येथील सरकारी क्षेत्रा ६.९९ हेक्टर निश्चित केले आहे. या जागेत गेल्या कित्येक वर्षापासून कृषी चिकित्सालय (फळरोप वाटीका) म्हणून प्रसिद्ध आहे. या जागेत औषधी वनस्पतीसह अन्य वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले होते. आजरा कृषी कार्यालयातर्गत मातृवृक्षांची लागवड केलेली आहे. या क्षेत्रात जातीवंत बेगुर्ला-४ काजू व इतर मातृवृक्ष १५० आहेत. सिसम, करंज, बकुळा, आवळा, हिरडा या वृक्षांचेही संवर्धन केले आहे. उर्वरित क्षेत्रात पॉलीहाऊसची उभारणी करण्यात आली. याशिवाय अस्तरीकरणासह शेततळे करण्यात आले आहे. नारायणबाग म्हणून या जागेची प्रसिद्धी आहे. याच बागेत कृषी विभागाचे कार्यालय चित्री नदी तीन किमी इतकी पाईपलाईन आहे. गडहिंग्लज उपविभागातील आजरा आणि चंदगड हे दोन तालुके काजू उत्पादन प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. चंदगड हे काजू भौगोलिक मानाकंन् करून घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत काजू उत्पादक संघ व प्रक्रिया उद्योग यांच्या समवेत चर्चा झाली आहे. ही पार्श्वभुमी लक्षात घेतली तर औद्योगिक वसाहतीसाठी या जागेचे संपादन करण्यात येवू नये अशीच या परिसरातील जनतेची सार्वत्रिक भावना आहे. शासनाने यावर उपाय म्हणन २०११ मध्ये फळरोप वाटीका किंवा तालुका बीज गुणन केंद्राच्या जमीनी खाजगी संस्था, नगरपालिका आणि कोणत्याही संस्थेला हस्तांतरीत न करण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे.
या पार्श्वभुमीवर औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक म्हणून या नारायण बाग या जागेचे संपादन करण्यात येवू नये ही बाग म्हणजे आजच्याच्या ओळखीतील एक ठळक गोष्ट आहे. या बागेशी आजऱ्यातील जनतेच्या भावना गुंतलेल्या आहेत. औद्योगिक वसाहतीसाठी अन्य पर्यायी जागेचा शोध घ्यावा आणि सद्या शासनाने निर्णय घेतलेला रद्द करून वरील जागा संपादनातून वगळावी अशी आग्रही मागणी आहे. आजरा व पारेवाडी या दोन ठिकाणच्या मिलने १७.७२ हेक्टर जागा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लोकभावना आणि नारायण बाग जागेचे महत्व लक्षात घेवून औद्योगिक वसाहतीसाठी संपादीत केली जाणारी ही जागा बगळून अन्य आगेचा पर्याय लक्षात द्यावा अशी मागणी करीत आहोत.
लोकभावना डावलून कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय लादला जावू नये. औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण ही गोष्ट आवश्यक असली तरी त्यासाठी ऐतिहासिक महत्व असलेल्या जागेचे संपादन कोणत्याही मुद्यावर समर्थनिय ठरणार नाही. म्हणून वरील निर्णय रद करण्यात यावा अन्यथा आम्हाला आंदोलनाच्या मार्गावर जावे लागेल आणि लोकभावनेचा आदर करण्यासाठी शासनावर दबाव आणावा लागेल असे नम्रपणे सुचित करीत आहोत.
आम्हाला विश्वास आहे. आपण या निवेदनाची गांभिर्याने दखल घेवून औद्योगिक वसाहतीसाठी संपादन केलेल्या आराखडयातून नारायण बाग वगळण्यात येईल पून्हा एकदा आपणास विनंती करीत आहोत की लोकभावना डावलून या जागेचे संपादन केले जावू नये असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, उप. ता. प्रमुख सुनील डोंगरे, संजय येसादे, उपशहर प्रमुख समीर चाॅद, युवा सेना महेश पाटील, तसेच दिनेश कांबळे, आनंदा येसने ,बिल्ला लतीफ, सागर नाईक, अमित गुरव, प्रदीप पाचवडेकर, शिवाजी इंगळे, सुयश पंडित सह शिवसेना युवा सेना शेतकरी सेना सह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
