Home कोंकण - ठाणे आजरा शहरात चेष्टा मस्करीतून – वाद – वादातून चाकू हल्ला- एकाचा मृत्यू

आजरा शहरात चेष्टा मस्करीतून – वाद – वादातून चाकू हल्ला- एकाचा मृत्यू

आजरा शहरात चेष्टा मस्करीतून – वाद – वादातून चाकू हल्ला- एकाचा मृत्यू

आजरा – प्रतिनिधी

आजरा शहरातील नाईक गल्लीत मित्रांमध्ये बोलत बोलत झालेली चेष्टा मस्करी, त्यानंतर सुरू झालेला चर्चेतून वाद अखेर या वादातून चाकू हल्ला झाल्याने यामध्ये कैफ साजिद खतिफ (वय २३ रा. वाडा गल्ली, आजरा) या तरुणाचा मृत्यू झाला असून सनी अब्दुल गफार तकिलदार (वय २६ रा. दर्गा गल्ली, आजरा) व आतिफ इस्माईल हिंग्लजकर (वय १९ रा. पटेल कॉलनी आजरा) हा गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित अरकम महम्मद लमतुरे, अबु सुफियान महम्मद लमतुरे, शकील हसनअली खेडेकर (सर्व रा. नाईक गल्ली, आजरा) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी…

बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाईक गल्ली येथील मरकज मस्जिद समोर हे सर्वजण एकत्र आले. सुरुवातीला वेगवेगळ्या विषयावरून त्यांच्यात थट्टा मस्करी सुरू झाली. कालांतराने त्यांच्यात वाद सुरू झाला व वादाचे पडसाद मारामारीत झाले. याचवेळी अरकम लमतुरे याने आपल्याजवळील चाकू काढून त्याने मृत कैफसह शमी तकिलदार व आतिफ हिंग्लजकर यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तर अबुसुफियान व शकील यांनी तिघांन लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केले.

यामध्ये कैफ खतीफ हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. तर समी तकिलदार व अतिफ हिंग्लजकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मयत कैफ च्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने संशयित अरकम याच्या घरावर दगडफेक केली व त्याच्या दुचाकीची मोडतोड केली. वातावरण तंग झाल्याने तीन पोलीस अधिकाऱ्यांसह २५ जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मरकज मस्जिद परिसरासह संपूर्ण नाईक गल्लीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. घटनास्थळी गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, जिल्हा रात्रगस्त विभाग, इचलकरंजीचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, भुदरगडचे पोलीस निरीक्षक गोरख चौधर, आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले सर्व अधिकारी यांन त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत ते घटनेची माहिती घेत होते. या घटनेबाबतचा अधिक तपास ठाणे अंमलदार रमेश गवळी
करत आहेत..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.