🛑आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत मोठी झेप ठेवी, कर्जवाटप , नफ्यात लक्षणीय वाढ. – NPA मध्ये घट
🛑शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द.ना.गव्हाणकर पुरस्कार
🛑आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत मोठी झेप ठेवी, कर्जवाटप , नफ्यात लक्षणीय वाढ. – NPA मध्ये घट.
आजरा :- प्रतिनिधी.

आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टी-स्टेट) यांनी आर्थिक वर्ष 2025-2026 साठी जाहीर केलेल्या अहवालानुसार बँकेने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
बँकेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ होऊन त्या 1,02,567.08 लाखांवरून 1,16,199.62 लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच कर्जवाटपातही वाढ होऊन 65,583.63 लाखांवरून 79,540.46 लाखांपर्यंत वाढ झाली आहे.

एकूण व्यवसायात देखील मोठी झेप घेत बँकेचा व्यवसाय 1,68,150.71 लाखांवरून वाढून 1,95,740.08 लाखांपर्यंत पोहोचला आहे. करपूर्व नफा 810.03 लाखांवरून वाढून 1,135.35 लाख झाला असून, बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे.
याशिवाय, बँकेने मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा करत Gross NPA 3.11 टक्क्यांवरून 2.20 टक्क्यांपर्यंत घटवला आहे. तसेच क्रेडिट-डिपॉझिट रेशो 64 टक्क्यांवरून वाढून 68 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांनी सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतक आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे मनःपूर्वक

🛑शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द.ना.गव्हाणकर पुरस्कार
आजरा.- प्रतिनिधी
पुरस्कार समितीच्या बैठकीत निर्णय, पत्रकार परिषदेत जेष्ठ सदस्य मुकुंद देसाई यांची घोषणा.
शाहिरी ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाज प्रबोधन हेच तिचे मुख्य प्रयोजन आहे हा विचार केंद्रस्थानी ठेऊन ज्यांनी आपली शाहिरी कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासींच्या मुक्तीदायी राजकारणासाठी वापरली त्या शाहीर गव्हाणकर यांचा वसा आणि वारसा घेऊन समाज प्रबोधन घडवणाऱ्या शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना, गव्हाणकर पुरस्कार देण्याचा निर्णय आज झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पुरस्कार समितीचे जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई, जि प सदस्य सुधीर देसाई, कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई, सचिव सुनील पाटील, प्रा.डॉ. नवनाथ शिंदे, युवराज पोवार, प्रा. मीना मंगळूरकर, रावसाहेब देसाई, मनोहर गव्हाणकर, संजय घाटगे, कॉ. संजय तर्डेकर, प्रकाश मोरुस्कर, दिगंबर लोहार, काशिनाथ मोरे, कृष्णा सावंत, रणजीत कालेकर, अमित सामंत, हिंदुराव कांबळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा करतांना मुकुंददादा देसाई म्हणाले की संभाजी भगत यांना एक बंडखोर शाहीर म्हणून अख्खा महाराष्ट्र ओळखतो. लोकशाहीर गव्हाणकरांचा वारसा सांगत त्यांची शाहिरी जातीय, वर्गीय आणि लैंगिक शोषणावर घणाघाती प्रहार करते. लोकगीतातील रसरसीत जिवंतपणा हे त्यांच्या शाहिरीचे वैशिष्ट्य आहे. पोवाडे, भारुडे, ओवी, अभंगासह अनेक लोककलांमध्ये क्रांतिकारक आशय भरत त्यांनी जनप्रबोधनासाठी लोककलांचा अत्यंत प्रभावी वापर केला. त्यांचे कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र), अडगळ (नाटक), तोड ही चाकोरी (गाण्याचा संग्रह), रणहलगी (लेखसंग्रह), भारुड आणि गिरणीचा वग (मुक्तनाट्य), शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक) इत्यादी साहित्य प्रसिध्द आहे. त्यांच्या कोर्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. लोकशाहीर गदर यांची अनेक गाणी त्यांनी मराठीत आणली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना अस्मितादर्श पुरस्कार, प्रबोधनमित्र पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या या लोकशाहिरीशी असलेल्या नात्याचा विचार करून आम्ही यावर्षीचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी सातारा येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत.
यापूर्वी हा पुरस्कार डॉ आ ह साळुंखे, वाहरू सोनवणे, कॉम्रेड कृष्णा मेनसे, प्रतिभा शिंदे, नागराज मंजुळे यांना निखिल वागळे, गणेश देवी, जयसिंगराव पवार, डॉ भारत पाटणकर, संजय आवटे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
