Homeकोंकण - ठाणेराज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाची मद्य तस्करावर कारवाई.- चार लाखाचा मुद्देमाल...

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाची मद्य तस्करावर कारवाई.- चार लाखाचा मुद्देमाल केला जप्त

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाची मद्य तस्करावर कारवाई.- चार लाखाचा मुद्देमाल केला जप्त

कोल्हापूर, दि. ३१ (प्रतिनिधी)

शहरातील प्रतिभानगर येथे अवैध गोवा विदेशी मद्य वाहनावर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


कोल्हापूरातील प्रतिभानगर परिसरात पंचगंगा बँकेसमोर वॅगनार ( एम एच १२ जी एफ ६७३२) ची तपासणी केली असता, विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या ७५ बाटल्या आढळून आल्या. वाहनासह ३ लाख ९४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये मद्याची किंमत ४४ हजार ४०० व वाहनाची किंमत ३ लाख ५० हजार आहे. या गुन्हयात संशयित सागर शामराव देसाई (वय ३२, रा. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे, एस. पी. डोईफोडे, आर. एम. पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, जवान मारुती पोवार, राजेंद्र कोळी, योगेश शेलार, राहुल कुटे आदींनी केली. गुन्हाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.