छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर –
आजरा तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये शिबीराचे आयोजन.- मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.- तहसीलदार समीर माने यानी केले आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ ची अंमलबजावणी करण्याबाबत.
शासन निर्णय क्र. मराअ-२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-१ दि.१८ फेब्रुवारी, २०२६ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ अन्वये योजना आजरा तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार सर्वसामान्य जनमा व शेतकरी यांचे महसूल विभागागर्तत क्षेत्रीय कार्यालयाशी दैनंदिन प्रश्न निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदीच्या जनजागृती प्रभावी अंमलबजावण्धी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे नागरिकांना एकदिवशीय सेवा पुरविणे या उद्देशाने माहे ७ मार्च २०२६ ते १५मे-२०२६ या कालावधीमध्ये राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगरपरिषद नगरपंचायत पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ राबविण्याबाबत निर्देशीत करण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी आण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल आजरा, आजरा हायस्कूल आजरा, शनिवार १४ मार्च २०२६ गवसे रवळनाथ मंदिर गवसे, शुक्रवार १० एप्रिल २०२६ मलिग्रे मलिकअर्जुन मंदिर मलिग्रे, शुक्रवार १७ एप्रिल २०२६ उत्तूर महादेव मंदिर उत्तूर व शुक्रवार १५ मे २०२६ रोजी आजरा प्रशासकिय हॉल तहसिल कार्यालय आजरा या दिवशी अभियानातर्गत प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजीटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ, उत्पन्न, रहिवास आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र, घरासाठी पत्रे वाटप ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी करण्यात येणार असल्याने सदर योजनांचा लाभ असंख्य नागरिकांनी घ्यावा, असे अवाहन तहसिलदार आजरा समीर माने यानी केले आहे.




