Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर मध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.

वसंतराव देसाई आजरा साखर मध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.

वसंतराव देसाई आजरा साखर मध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.

आजरा .- प्रतिनिधी.

गवसे ता. आजरा येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांच्या हस्ते कारखाना मेन गेटवर सुरक्षितता ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात चेअरमन श्री. देसाई म्हणाले की, सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःबरोबर कारखाना व समाज सुरक्षित राहील यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहून काम करावे. त्यासाठी प्रशासनाची आपल्याला कायम साथ राहील. निष्काळजीपणा आणि बेफिकीरपणाने केलेले काम स्वतःबरोबर समाजाला हानिकारक ठरते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस के सावंत, जनरल मॅनेजर एम आर पाटील, कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई, एच आर मॅनेजर एस पी भादवणकर, ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई, सुरक्षा अधिकारी जगदीश देसाई, हेड टाईम किपर लहू पाटील यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख उपखाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.