HomeUncategorizedलाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! - अधिवेशनात मंत्र्यांचं मोठं विधान… पहा...

लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! – अधिवेशनात मंत्र्यांचं मोठं विधान… पहा अधिक माहिती 👇आम. सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न.

लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! – अधिवेशनात मंत्र्यांचं मोठं विधान… पहा अधिक माहिती 👇आम. सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न.

मुंबई :- प्रतिनिधी.

महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय आहे. याच योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र, अद्याप हप्त्याच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाहीये. उलट लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. इतकेच नाही तर आता महायुती सरकारमधील एका मंत्र्याने अधिवेशनात केलेल्या विधानामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो. या हप्त्यासाठी राज्य सरकार अन्य खात्याचा निधी वळवून त्याची पूर्तता करत आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हप्ता वेळेवर मिळत नाहीये. तसेच सरसकट सर्व महिलांना लाभदेण्याच्या ऐवजी योजनेची ईकेवायसी करुन अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करण्यात येत आहे. असे असतानाच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं, वनविभागाच्या अंतर्गत फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र हे कॉर्पोरेशन सुरु झाल्यापासून सागाची लागवड केली आहे.

ही 12 हजार कोटींची संपत्ती झाली आहे. अशा प्रकारे राज्य सरकारने विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून आणले आहेत. त्यात लाडकी बहीण योजना स्वीकारली… जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करणारी परिस्थिती निर्माण करत असली तरी ही योजना बंद होणार नाही.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचं वारंवार विरोधकांकडून बोललं जात होतं. आता सरकारमधील मंत्र्यानेच याला एक प्रकारे दुजोरा दिला आहे. तसेच योजनेमुळे इतर खात्यांवर ताण येत असल्याने आता योजना बंद होणार तर नाही ना? लाडक्या बहिणींना पैसे मिळणार की नाही? असे विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

निवडणुका संपल्या..- लाडक्या बहिणीची प्रतिक्रिया.- लोकसभा , विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद – पंचायत समिती – आता निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मतदारांची आता गरज नाही. गरज संपली. असे काही जागृत लाडक्या बहिणीच्या कडून प्रतिक्रिया येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.