Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र भादवण हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन.- विविध उपक्रमाने संपन्न

भादवण हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन.- विविध उपक्रमाने संपन्न

भादवण हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन.- विविध उपक्रमाने संपन्न

आजरा.- प्रतिनिधी.

भादवण येथील भादवण हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञानविषयक जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विविध शैक्षणिक, सर्जनशील आणि प्रयोगशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामण आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. मुख्याध्यापक आर. जी. कुंभार, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विज्ञानगीत सादर करण्यात आले. शिक्षक प्रशांत गुरव व विद्यार्थी श्रवण सुतार, पायल सुतार यांनी विज्ञानविषयक प्रेरणादायी फलकलेखन सादर केले.
विविध स्पर्धा व सादरीकरणात
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनोगत कार्यक्रमात वैदेही परीट, अश्विता सिमणे, अधिराज देसाई, तन्मय देवरकर, सुशांत खुळे, वेदांत गोईलकर, प्रतीक्षा डोंगरे, अमृता गारडे, श्रावणी सिमणे, प्रणाली ढेंगे, अधिराज डोंगरे, श्रवण सुतार या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग आणि आधुनिक संशोधन यावर प्रभावी विचार मांडले. भारतीय तसेच परदेशी शास्त्रज्ञांच्या विज्ञानातील योगदानावर भाषण स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिकांचे कार्य, संशोधन आणि मानवजातीसाठी दिलेले योगदान सानिका वडराळे,आर्या कुंभार व अश्विता सिमणे या विद्यार्थिनींनी प्रभावी शब्दांत मांडले. विद्यालयात विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वैज्ञानिकांची छायाचित्रे असलेले भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विज्ञान कोडे-कुट प्रश्न स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा आणि वैज्ञानिक आकृत्यांचे सादरीकरण या उपक्रमांना आठवी व नववीतील सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बालवैज्ञानिकांनी एकूण ४२ विविध वैज्ञानिक प्रयोगांची मांडणी व सादरीकरण करून उपस्थितांना अचंबित केले.गुरुत्वाकर्षण,प्रकाशाचे परावर्तन, रासायनिक, अभिक्रिया, जलशुद्धीकरण, आय.आर. सेंसर निर्मिती यांसारख्या विषयांवरील प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित मॉडेल्सद्वारे विज्ञानाची सुलभ मांडणी केली.
विद्यालयात विज्ञान कक्ष निर्मितीचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला चालना देण्यात आली.तसेच वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित रांगोळी स्पर्धेत रिया कांबळे, श्रावणी सुतार,मानसी कामत पायल सुतार, भूमिका मुळीक, प्राची शिंत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. अणुरचना,सौरमाला,डीएनए संरचना अशा संकल्पनांची आकर्षक रांगोळी विद्यार्थ्यांनी रेखाटली. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सकवृत्ती आणि नवोपक्रमशीलता विकसित होण्यास मदत झाली. वाद्यवृंदातील आदेश पाटील, सुजल देसाई,विशाल गोईलकर, ऋत्विक आजगेकर इ.विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विज्ञान हे प्रगतीचे मूळ असून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्याची आणि शोध घेण्याची वृत्ती जोपासावी,असे आवाहन केले.मराठी विषय शिक्षिका बी. पी. कांबळे व आर.पी. होरटे यांनी राबविल्या गेलेल्या वैज्ञानिक उपक्रमांना, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या या कार्यक्रमामुळे भादवण हायस्कूलमध्ये ज्ञान, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम भादवण ग्रामस्थ व पालकांना अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमातील सहभागी व नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिका मुळीक व प्राची शिंत्रे यांनी केले तर आभार विज्ञान विषय शिक्षक प्रशांत गुरव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विज्ञान विषय शिक्षक पी. एस. गुरव व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतर शिंपी, सचिव अभिषेक शिंपी व सर्व संचालक यांची प्रेरणा मिळाली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.