Homeकोंकण - ठाणेमुंबईतच गिरणी कामगारांना घरे मिळवण्यासाठी - आंदोलनाची घोषणा करण्याकरिता सभांचे आयोजन.- सर्व...

मुंबईतच गिरणी कामगारांना घरे मिळवण्यासाठी – आंदोलनाची घोषणा करण्याकरिता सभांचे आयोजन.- सर्व श्रमिक संघटना.

मुंबईतच गिरणी कामगारांना घरे मिळवण्यासाठी – आंदोलनाची घोषणा करण्याकरिता सभांचे आयोजन.- सर्व श्रमिक संघटना.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

मुंबईतच गिरणी कामगारांना घरे मिळवण्यासाठी पुन्हा आंदोलनाची घोषणा करण्याकरिता सभांचे आयोजन सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
(गिरणी कामगार विभाग) मुंबईत घरे नाकारणारे १५ मार्च २०२४ शासन निर्णयामधील कलम १७ रद्द करण्यात आपण मिळविले यश
गिरणी कामगारांना मुंबईतुन हद्दपार करून वांगणी/शेलूला पाठवणारे १७ नंबर कलम आपल्या चळवळीमुळे रद्द झाले आता मुंबईतच गिरणी कामगारांना घरे मिळविण्याच्या आपल्या पुढील आंदोलनाची घोषणा करण्याकरिता खालील सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पुन्हा मुंबईला – आपला हक्क सांगायला
बुधवार दिनांक 4/3/2026 रोजी दुपारी 11.00 वाजता नाथ मंदिर (विटा)
बुधवार दिनांक 4/3/2026 रोजी दुपारी 2.00 वाजता हुतात्मा स्मारक (सातारा)
गुरुवार दिनांक 5/3/2026 सकाळी 11.00 वाजता लक्ष्मी देवालय (अलाबाद कागल) गुरुवार दिनांक 5/3/2026 दुपारी 12.30 वाजता इंजुबाई मंदिर (गारगोटी)
गुरुवार दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 2.00 वाजता बळी पाटील यांचे घरी (मुदाळतिटा)
शुक्रवार दिनांक 6/3/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता किसान भवन (आजरा)
शुक्रवार दिनांक 6/3/2026 रोजी दुपारी 1.00 वाजता रवळनाथ मंदिर (अडकुर)
शनिवार दिनांक 7/3/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता महाकाली मंदिर (महागाव)

शनिवार दिनांक 7/3/2026 रोजी दुपारी दुपारी 1.00 वाजता (बोडकेनट्टी कर्नाटक) या सर्व सभांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईहुन कॉम्रेड उदय भट कॉम्रेड विजय कुलकर्णी कॉम्रेड बी के आंब्रे कॉम्रेड संतोष मोरे येणार आहेत. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे गिरणी कामगार व वारसदारांनी या सभेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन सर्व गिरणी कामगारांना मुंबईत मोफत घरे मिळण्याचा आपला लढा यशस्वी करा असे आवाहन
कॉम्रेड अतुल दिघे अध्यक्ष सर्व श्रमिक संघ कोल्हापूर, कॉम्रेड दत्तात्रय अत्याळकर मुंबई प्रतिनिधी, कॉम्रेड शांताराम पाटील (आजरा) कॉम्रेड धोंडीबा कुंभार (गडहिंग्लज) कॉ पद्मिनी पिळणकर कॉ गोपाळ गावडे (चंदगड) कॉ अमृता कोकितकर कॉ कृष्णात चौगुले (राधानगरी) कॉ बबन शिंदे (भुदरगड) कॉ लक्ष्मण कामते (कागल) कॉ गोपाळ पाटील (सांगली) कॉ शंकर पाटील (सातारा) यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.