Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशिक्षण हक्क निघणाऱ्यायात्रेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा बैठकीत निर्णय. ( आजरा येथील...

शिक्षण हक्क निघणाऱ्यायात्रेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा बैठकीत निर्णय. ( आजरा येथील बैठकीत आवाहन.)

शिक्षण हक्क निघणाऱ्या
यात्रेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा बैठकीत निर्णय. ( आजरा येथील बैठकीत आवाहन.)

आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथील शिक्षण हक्क यात्रा दि. २६ रोजी निघणाऱ्या शिक्षणाकडे यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय आजरा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा सुनील शिंत्रे होते. यावेळी कॉ संपत देसाई प्रा नवनाथ शिंदे, युवराज पोवार, संभाजी बापट, देवदास बोलके, विक्रम देसाई, कॉ शांताराम पाटील, दशरथ घुरे यांची प्रमुख उपस्थित होती.

सुरुवातीला शिक्षण हक्क यात्रेचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी आंदोलनामागील भूमिका सांगून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू या असे आव्हान केले. प्रा. श्री‌. शिंत्रे यांनी आंदोलनाच्या तयारीत आपण सर्वांनी तन-मन-धन अर्पण उतरावे. उद्या सुरू होणारी ही यात्रा कोल्हापुरात २८ रोजी पोहोचेल. तिथे शिक्षणात परिषदेने या यात्रेची सांगता होईल.

यावेळी संभाजी बापट उमाजी कुंभार, एकनाथ गिलबिले, रामदास मोरवाडकर यांनीही काही सूचना केल्या उद्या होणाऱ्या यात्रेत तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीने या सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
उद्या चंदगड येथून शिक्षण हक्क यात्रा इथे आल्यानंतर ठीक १ वाजता छ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तहसील कार्यालयावर जाईल असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.