मेंढोली गावच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न करणार. जयवंत सुतार.
आजरा.- प्रतिनिधी.
मेंढोली गावच्या लोकांनी गटतट विसरून विकासासाठी माझ्या पाठिशी राहिलात याची जाणीव ठेवून मेंढोली गाव दत्तक घेतले आहे. या पाच वर्षात गावचा चेहरामोहरा बदलून गावच्या सर्वागीन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत मेंढोली येथील गुरवळ ओढा साकव भुमिपुजन प्रसंगी जयवंत सुतार यांनी व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी आजरा नगराध्यक्ष अशोक चर्हाटी होते. स्वागत लक्ष्मण शिंत्रे यानी केले. यावेळी सुतार यांनी साकवसाठी आमदार शिवाजीराव पाटील याच्या माध्यमातून ओढ्यावरील साकव व गावातील रस्त्यासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याचे तसेच सरपंच विलास जोशिलकर याच्यासह गावकरी सोबत राहिल्याने गावच्या विकासासाठी प्राधान्य दिल्याचे
सागितले. पंचायत समिती सदस्य समिर पारदे यानी पंचायत समितीच्या माध्यमातून या गावासाठी काम बाकी ठेवणार नसल्याचे आश्वासन
दिले.
यावेळी संभाजीराव सरदेसाई, सरपंच विलास जोशिलकर, विकास सेवा संस्था माझी चेअरमन आप्पासो चौगले,
जितेंद्र नांदवडेकर, ग्रामपंचायत सदस्य मंबई मंडळाचे अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन आभार आनंदा कातकर यांनी केले.




