वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या सन 2025-26 गळीत हंगामाची सांगता संचालक काशिनाथ तेली व सौ. स्मिता तेली यांचे शुभहस्ते सत्यनाराण महापूजा.
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा सन 2025-26 चा 27 वा गळीत हंगाम 105 दिवस चालून या हंगामात 306880 मे.टन ऊसाचे गाळप होवून सरासरी 11.84 टक्के साखर उतारा-यांने 363225 विंच. साखरेचे उत्पादन झाले. कारखान्यात या वर्षी गाळप झालेल्या ऊसापैकी आजरा तालुक्यातून 168275 मे.टन तर शेजारच्या गडहिंग्लज, चंदगड, आंबोली गेटकेन मधून 138605 मे. टन ऊसाचे गाळप केले. हंगाम समाप्ती निमित्य आज कारखान्याचे संचालक काशिनाथ तेली व सौ. स्मिता तेली या उभयतांचे शुभहस्ते सत्यनाराण महापूजा संपन्न झाली. तसेच चेअरमन मुकुंदराव देसाई यांचे शुभहस्ते व संचालक मंडळाचे उपस्थितीत साखर पोत्यांचे पुजनाचा कार्यक्रम पार पडला.
सन 2025 च्या पावसाळयात आजरा तालुक्यात सरासरीच्या दुप्पटींने पाऊस होवून त्याचा परिणाम तालुक्यातील ऊस पिकावर झाला. विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात ऊसाचे पिक अत्यंत निकृष्ठ प्रतिचे निघाले. संपुर्ण तालुक्यातच ऊस उत्पादनात सरासरी 30 ते 40 टक्के घट झाली, तर साखर उता-यावरही त्याचा परिणाम झालेचे दिसून आले. यावर्षी परजिल्हयातील तोडणी मजूरांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली तर जी यंत्रणा हजर झाली त्यामध्ये मजूरांची संख्या अत्यल्प असलेंने दैनंदिन ऊस पुरवठ्यावरही त्याचा गंभिर परिणाम झाला. या सर्व अडचणीच्या परिस्थितीवर मात करीत कारखाना व्यवस्थापनाने उपलब्ध परिस्थितीतही काटेकोर नियोजन करून कारखान्याच्या गाळपात सातत्य ठेवून तीन लाख ऊस गाळपाचा टप्पा पार केला. खर तर तालुक्यातील पश्चिम भागातील पावसामुळे निकृस्ट झालेला ऊस तोडून गळीतास आणणेचे कारखान्यासमोर मोठे आवाहन होते पणं व्यवस्थापनांने शेतक-यांना दिलासा मिळावा म्हणून परिणामी जादा खर्च करून तो ऊस गळीतास आणला व शेतक-यांची अडचण दूर केली.
याबाबत कारखान्याचे चेअरमन श्री.देसाई यांनी झालेल्या गळीत हंगामात कारखान्याचे ठरविलेले गळीताचे उद्दिष्ठ जरी पुर्ण झाले नसले तरी प्रतिकुल परिस्थितीत कारखान्याचे संचालक मंडळांने योग्य निर्णय घेतले तसेच सर्वच विभागांनी समाधान कारक कामगिरी केली. त्यामुळे तालुक्यातील ऊस पिकाची परिस्थिती चांगली नसतांना व पुरेशी तोडणी वाहतुक यंत्रणा उपलब्ध नसतांनाही तीन लाखावर ऊस गाळप केले आहे पुढील गळीत हंगामासाठी यापेक्षाही नेटके नियोजन करून समाधानकारक ऊस गाळप केले जाईल असे सांगून गळीत हंगाम 2025-26 यशस्विरीत्या पार पाडणेकामी कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, सर्व विभाग प्रमुख, कामगार संघटना, तसेच कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांस ऊस पुरवठा करणा-या शेतक-यांचे, तोडणी वाहतुक कंत्राटदार, व्यापारी, यावेळी अधिकारी व कर्मचारी आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई कारखान्याचे संचालक मधुकर देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक एस.के. सावंत, जनरल मॅनेंजर (टेक्नि.) एम.आर.पाटील, चिफ अकौंटंट, प्रकाश चव्हाण, चिफ केमिस्ट सुजय पाटील, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, एच.आर. मॅनेंजर सुभाष भादवणकर, डे. चिफ अकौंटंट. रमेश वांगणेकर, सिव्हील इंजि. शंकर आजगेकर, बैंक स्थायी अधिकारी रमेश देसाई अन्य विभाग प्रमुख तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग उपस्थित होते.




