डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवड
( संस्थापक राजकीय विश्लेषक – राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर.)
कोल्हापूर, दि. 15 (प्रतिनिधी)

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवड करण्यात आली तर दीपक मांगले यांची राज्य संघटक म्हणून निवड करण्यात आली. संघटनेच्यावतीने जिल्हा, शहर व तालुका पदाधिकारी निवडीसाठी शाहू स्मारक येथे आयोजित संपादक, पत्रकारांच्या बैठकीत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी वरील निवड जाहीर केली. संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ. सायली मराठे, उपाध्यक्षपदी प्रीती कलढोणे यांचीही फेरनिवड करण्यात आली. तर कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला व इचलकरंजी महानगर अध्यक्षपदी रणधीर नवनाळे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील काही तालुकाध्यक्षांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. राज्यभरात चौदा हजाराहून अधिक सभासद संख्या असलेली ही संघटना आता महाराष्ट्रासह इतर सहा राज्यातही विस्तारली आहे. रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी निवडप्रक्रिया पार पडली. स्वागत महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सायली मराठे यांनी तर प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी केले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, प्रदेश महासचिव विकास भोसले, प्रदेश उपाध्यक्ष इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर, अमोल पाटील, राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांची प्रमुख उवस्थिती होती. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजा माने, अनिल पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, संघटक विनायक कलढोणे, एकनाथ पाटील, सागर धुंदरे, कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष विजय यशपुत्त, हातकणंगले तालुकाध्यक्ष विनोद शिंगे यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट.
यावेळी निवडण्यात आलेले इतर पदाधिकारी याप्रमाणे – साप्ताहिक विभाग कोल्हापूर जिल्हाध्यक्ष – विजय फडतारे, पश्चिम महाराष्ट्र संघटक – रसूल जमादार, कोल्हापूर शहर जिल्हा उपाध्यक्ष – राजा मकोटे, इचलकरंजी शहर महिला आघाडी अध्यक्षा – अंजुम मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष – प्रकाश ऐनापुरे, जिल्हा महासचिव – कीर्तिराज जाधव, सचिव – अंकुश पोळ, संघटक – सलीम संजापुरे व महेश पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष – विनोद शिंगे, शिरोळ तालुकाध्यक्ष – संजय सुतार, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष – अशोक मोहिते, आजरा तालुकाध्यक्ष – संभाजी जाधव, चंदगड तालुकाध्यक्ष – निवृत्ती हरकारे, करवीर तालुकाध्यक्ष – ज्योतीराम घोडके. याप्रसंगी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नूतन पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संपादक, पत्रकारांसह दयानंद लिपारे, मेहबूबखान पठाण, रामनाथ डेंगळे, प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे आदी उपस्थित होते. दीपक मांगले यांनी आभार मानले.
