🛑अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.- विठ्ठल रुक्माई मंदिर मडिलगे येथे होणार संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
मडिलगे ता.- आजरा येथील वारकरी संप्रदाय तरुण मंडळे सर्व भजनी मंडळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत मधील व देवस्थान समिती मधील आयोजित फाल्गुन शुक्ल पष्टी शके १९४७ शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ ते शुक्ल पक्ष एकादशी शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ अखेर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे.
या सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम.- सकाळी ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, सायं ४ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन, व रात्री ११. ३० ते ३.३० हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम असतील.
💥सप्ताह सोहळा चे व्यासपीठ आधिपत्यक –
ह भ प. दत्तात्रय जोतिबा निऊगरे, व ह भ प. संजय शामराव पाटील. ( नगर प्रदक्षिणा व दीपोत्सव – शुक्रवार दि.२७/२/ २०२६ रोजी सायं ४ ते ७ नगर प्रदक्षिणा व सायंकाळी ७ वा. दीपोत्सव.
🚩या सोहळ्यातील कीर्तनकार.व किर्तनसाथ
दि. २१ रोजी ह भ प. तानाजी पाटील महाराज.- किर्तनसाथ – खेडे आत्या इचरकंजी वडकशिवाले आजरा गांधीनगर देवर्डे व कोरीवडे.
💥दि. २२ रोजी ह भ प. डॉ. विश्वनाथ पाटील महाराज – किर्तनसाथ.- हालेवाडी अर्धा कोवाडे ममदापूर जाधवाडी करंबळी व भादवणवाडी
💥दि.२३ रोजी. ह भ प. डॉ. एस डी पन्हाळकर महाराज.- किर्तनसाथ.- उन्हाळी मुमेवाडी, उत्तुर, धामणे, चिमणे व महागोंड
💥दि. २४ रोजी ह भ प. पूर्णापंद काजवे महाराज.- किर्तनसाथ.- साळगाव, मासेवाडी, धामणे, पिंपळगाव, उत्तुर, हिरालगे, खेडे, आत्याळ
💥दि.२५ रोजी ह भ प. एकल महाराज.- किर्तनसाथ.- मासेवाडी, पेरणोली, करपेवाडी, जाधवाडी, खेडे, सुलगाव व जखेवाडी.
💥दि. २६. ह भ प. पोतदार महाराज.- किर्तनसाथ – महागोंड, सुलगाव, आरळगुंडी, पेंढारवाडी, उत्तुर, गांधीनगर – आजरा, खेडे व अत्याळ
💥दि.२७. रोजी ह भ प. राहुल कदम महाराज.- किर्तनसाथ – जाधेवाडी, शेळप, गवसे, आत्याळ, धामणे, खेडे, मासेवाडी, भादवण, हुनगिनाळ, व हजगोळी.

💥दि. २८ रोजी ह भ प. राहुल कदम महाराज.- किर्तनसाथ – जाधववाडी शेळके धामणे खेडे मासेवाडी भादवण हूनगीनाळ व होजगोळी
असे कीर्तनकार व कीर्तनसाथ देणारी ह भ प महाराज आहेत. काल्याचे किर्तन झाल्यानंतर
दि. २८ रोजी ९ ते १ महाप्रसाद आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक वारकरी संप्रदाय तरुण मंडळी सर्व भजनी मंडळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत, देवस्थान समिती, देणगीदार मडिलगे ता. आजरा यांनी केले आहे.
