Homeनागपूर - विदर्भ७५ आज़ादी का अमृत महोत्सव - सर्वेक्षण - महिला व पुरुष स्वच्छतागृहात....

७५ आज़ादी का अमृत महोत्सव – सर्वेक्षण – महिला व पुरुष स्वच्छतागृहात. – पैसे टाकून दरवाजा उघडत नाही.- नियोजनाचा अभाव – आजरा नगरपंचायतचे दुर्लक्ष.🟣भादवण हायस्कूल येथे एसएससी बोर्ड विद्यार्थी – यांना शुभेच्छा समारंभ संपन्न.🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा संपन्न.

🛑७५ आज़ादी का अमृत महोत्सव – सर्वेक्षण – महिला व पुरुष स्वच्छतागृहात. – पैसे टाकून दरवाजा उघडत नाही.- नियोजनाचा अभाव – आजरा नगरपंचायतचे दुर्लक्ष.
🟣भादवण हायस्कूल येथे एसएससी बोर्ड विद्यार्थी – यांना शुभेच्छा समारंभ संपन्न.
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा संपन्न.

🛑७५ आज़ादी का अमृत महोत्सव – सर्वेक्षण – महिला व पुरुष स्वच्छतागृहात. – पैसे टाकून दरवाजा उघडत नाही.- आजरा नगरपंचायतचे दुर्लक्ष.

आजरा.- प्रतिनिधी.

७५ आज़ादी का अमृत महोत्सव
सर्वेक्षण – महिला व पुरुष स्वच्छतागृह. – पैसे टाकून दरवाजा उघडत नाही. व लोकप्रतिनिधी सह प्रशासन विकास केलेल्या गप्पा मारत
ULB CODE -900589 आजरा नगरपंचायत आजरा महिला व पुरुष स्वच्छतागृह परिस्थिती आहे. आजरा तहसील कार्यालय नजीक व हद्दीत असणारे स्वच्छतागृहांत पाच रुपयेचा कॉइन टाकून स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो पण तो दरवाजा उघडतच नाही. ७५ आज़ादी का अमृत महोत्सव योजनेअंतर्गत स्वच्छतागृह महिला व पुरुष असे बसवले आहे.
एकीकडे स्वच्छ सुंदर शहर अशी घोषणा शासन करत आहे. दुसरीकडे आजरा शहरात बाजार मैदान शेजारी असलेले स्वच्छतागृह व छत्रपती संभाजी महाराज चौकात अशी दोनच स्वच्छता गृह आजरा शहरात आहेत. अन्य ठिकाणी आठवडा बाजार असो किंवा अन्य वेळी तालुक्यात येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छता गृह का? नाही. कचरा व्यवस्थापन घंटागाडी असली तरी काही नागरिक घंटागाडी असूनही रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला नागरिकांनी स्वतःच कचराकुंडी केली आहे. यावर नगरपंचायत दुर्लक्ष दिसून येते. मग कचरा टाकणारे काही नागरिक यांच्यावर कारवाई का? होत नाही. नव्या पाईपलाईन योजनेमुळे आजरा शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. आजरा शहरात रस्ते विकासामुळे धुळीच्या साम्राज्यात आहेच तर सातत्याने पाईपलाईन गळती, काही नागरिकांच्या नव्याने झालेल्या कचरा कुंड्या निवडणुका पूर्वी प्रशासक होतं आता नगरपंचायत निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात लोकप्रतिनिधी आहेत. अशा काही बाबींकडे या लोकप्रतिनिधी यांनी देखील लक्ष दिले पाहिजेत. फक्त महिलांसाठी योग्य व सुरक्षित असलेले स्वच्छतागृह होणं गरजेचे आहे. यामुळे या गोष्टीकडे आजरा नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आजरा तहसील शेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहात अनेक लोकांचे दरवाजा उघडण्यासाठी टाकलेले पैसे अडकले पण दरवाजा उघडला नाही. मग हे बंद असलेले स्वच्छतागृह कशासाठी ठेवले आहे.‌ असा प्रश्न उपस्थित होतो. यापूर्वी आजरा शहराच्या विविध समस्या बाबत आंदोलने व निवेदन दिली जात होती. पण आजरा नगरपंचायत निवडणुका झाल्यानंतर अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. किमान सदर स्वच्छतागृह तांत्रिक बिघाड दुरुस्त करावी किंवा सदर स्वच्छता बंद असल्याचा फलक लावावा फक्त विकासाच्या घोषणा करायच्या. व सार्वजनिक व शासकीय स्वच्छतागृहात पैसे टाकून प्रवेश करायचा अशा विकासावर लोकप्रतिनिधी व नागरिकांनी फक्त मागणी न करता प्रत्यक्षात शासनाने दिलेल्या योजनेचा योग्य लाभ नागरिकांना मिळण्यासाठी काम करावे. अशी मागणी नागरिकांच्या कडून होत आहे.

🟣भादवण हायस्कूल येथे एसएससी बोर्ड विद्यार्थी – यांना शुभेच्छा समारंभ संपन्न.

आजरा .- प्रतिनिधी.

भादवण हायस्कूल भादवणमधील एसएससी बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर जी कुंभार होते. या कार्यक्रमांसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून हरीष देवरकर यांनी दहावीनंतर काय? यासंबंधी करिअर मार्गदर्शन केले. “करियर निवडताना विचारपूर्वक शाखा निवडून आपले करिअर पूर्णत्वाकडे न्या” असा अनमोल सल्ला दिला. मुख्याध्यापक आर जी कुंभार यांनी परीक्षे संदर्भात सूचना दिल्या. वर्गशिक्षक आर पी होरटे, विषय शिक्षक पी एस गुरव श्रीमती एस एस नाईक सौ बी पी कांबळे यांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. गौरी कोलते, प्राची केसरकर, समृद्धी खुळे, वेदिका कडूकर, सृष्टी कोलते, अदिती पाटील, शुभम तोरगले, यांनी शाळेबद्दल ऋण व्यक्त केले. भूमिका मुळीक, आदिराज डोंगरे, दिगंबर पाटील अनुज पाटील या नववीच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. आठ खुर्चींचा सेट, पृथ्वीगोल नकाशा, एक डिजिटल फलक या स्वरूपात भेटवस्तू प्रदान करण्यात आली. अल्पोपहार, चहापान सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले. आभार व्ही एस कोळी यांनी मानले, सूत्रसंचालन श्रीमती एम एम जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पी एम वडर, संदीप पाटील, मारुती गोडसे, उपस्थित होते.

🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

प्राथमिक गटात अनन्या पिळणकर व माध्यमिक गटात रिया पारपोलकर प्रथम श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर कै शुभांगी गजानन वायंगणकर यांच्या स्मतीप्रित्यर्थ आयोजित शालेय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सुरवतीला कै शुभांगी वायंगणकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन डॉ. अंजनी देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत होते.

या स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम कमांक कु. अनन्या सिध्देश पिळणकर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा, व्दितीय क्रमांक कु. यशश्री विकास किल्लेदार – रोझरी इंग्लिश स्कुल आजरा तर तृतीय क्रमांक कु. अंतरा कृष्णा पाटील विद्यामंदिर होनेवाडी यांना मिळाला. तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. रिया संतोष पारपोलकर- आजरा हायस्कुल, आजरा, व्दितीय क्रमांक कु. आरोही कृष्णा पाटील रोझरी इंग्लिश स्कुल आजरा व तृतीय क्रमांक कु. हाजी महम्मद इरफान सय्यद व्यंकटराव हायस्कुल आजरा यांना मिळाला. विजेत्या स्पर्धकांना डॉ. अंजनी देशपांडे, वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आजरा तालुक्यातील विविध शाळातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नाट्यकलाकार श्री अनिल कांबळे व सौ वृषाली वाळके यांनी काम पाहिले. यावेळी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा विद्या हरेर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक बंडोपंत चव्हाण, महंमदअली मुजावर, चंद्रशेखर बटकडली, शोभा कुंभार, डॉ. रश्मी राऊत, अनिकेत गाडगिळ, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक विजय राजोपाध्ये यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.