चित्री मध्यम प्रकल्प पासून पूर्णवसन झालेले आत्ताचे चित्रानगर ग्रामस्थ यांनी एक.. अनोखी राबवली संकल्पना..पहा.
आजरा.- प्रतिनिधी.
जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी चित्री मध्यम प्रकल्प पासून पूर्णवसन झालेले आत्ताचे चित्रानगर ग्रामस्थ यांनी एक.. अनोखी संकल्पना राबवली नवीन पिढीला जुने गाव म्हणजेच चित्री मध्यम प्रकल्प च्या पायथ्याशी लपलेले पूर्वी गावठाण या नावाने ओळखले जाणारे गावठाणहे गाव दाखवण्यासाठी वयोवृद्ध ,लहान मोठ्या सर्व गाव चित्री वर सहल घेऊन गेले…. या मध्ये 4पिढ्या होत्या ज्यांनी त्या ठिकाणी जन्म घेतला वाढले आपले आयुष्य घालवले त्या घराच्या खाना खुणा तिथे असणारी मंदिर अंगण, पाणी टाकी, शाळा नविन पिढीला दाखवताना… जुन्या लोकांचे उर भरून आला….. प्रकल्प उभा रहात असताना केलेला संघर्ष याच्या खान खुणा नवीन पिढीला समजून सांगत होते..

परिस्थितीला दोन हात करण्या चे ज्या मातीने शिकवले त्या मातीत पुन्हा एकदा भेट देऊन संघर्षाच्या काळाला उजाळा मिळाला… व नवीन पिढीला संघर्षाशी दोन हात करण्याची शिकवण दिली….. महिला वर्ग जुन्या ठिकाणी गेल्या नंतर…. अंगणात असणाऱ्या.. जात्या पासून ते गोठ्यातील गाई पर्यंत ची स्पष्ट चित्र डोळ्या समोर उभी राहिली व डोळे आठवणींनी भरून आली. “अशी एक नवीन पिढीला प्रेरणा देणारी लढायला शिकवणारी”… त्यागाची प्रतीक असणारी… चित्री काराची संकल्पना पूर्ण केली.. यात अष्टप्रधान प्रतिष्ठान चित्रानगर. यांनी संकल्पना पूर्ण करण्यास विशेष योगदान दिले.

