🟣आजरा – आंबोली रोड आजरा पोलीस स्टेशन समोर कचऱ्याच्या ढीगाचे साम्राज्य का?
( नागरिक टाकतात या ठिकाणी
कचरा – नगरपंचायत चे दुर्लक्ष. )
🟣पेरणोली जि. प. प्रचारार्थ जयवंतरावंचा झंजावत.- लोकप्रतिनिधी नसताना कोट्यावधीची कामे.- प्रचार फेरीत महिलांची उपस्थिती लक्षणीय.
🟣आजरा – आंबोली रोड आजरा पोलीस स्टेशन समोर कचऱ्याच्या ढीगाचे साम्राज्य का?
( नागरिक टाकतात या ठिकाणी कचरा – नगरपंचायत चे दुर्लक्ष. )
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरातील कचरा व्यवस्थापन अद्यापही नियोजनबद्ध नाही. नगरपंचायत च्या पंचवार्षिक निवडणूक लागण्यापूर्वी प्रशासक कामकाज पाहत होत. यावेळी अनेक विषयावर वेगवेगळे लढे व आंदोलन होत होते. आता असे फारसे लढे होत नसले तरी नगरपंचायत वर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सह सर्व समितीवर सभापतींच्या नेमणुका करण्यात आले आहेत. कदाचित काही चालू असलेली विकास कामे ही आत्ताच होणार नाहीत. त्याला वेळ लागू शकतो काही ठिकाणी रस्ते विकास चालू आहे. परंतु कचरा व्यवस्थापन याकडेही आज नगरपंचायत चे दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा नियोजन नाही. ज्या विभागातील आजही कचरा रस्त्याच्या कडेला ढीग लागतात यामध्ये नागरिक ही सर्वांच्या समोर रस्त्यावर कचरा टाकतात हा कचरा लवकर उचलला जात नाही. रस्त्यावर कचरा टाकण्याची ठिकाणे देखील दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत.
यासाठी आता नगरपंचायत मध्ये फक्त कचरा व्यवस्थापन समिती सभापती करणे गरजेचे आहे. कारण स्वच्छता या विषयाशी आजरा नगरपंचायत चा काही संबंध नसल्याचा दिसतो. चक्क आजरा पोलीस स्टेशनच्या शेजारी अर्थात पोलीस स्टेशनच्या समोर नागरिक कचरा का? टाकतात हे कचरा टाकण्याचे ठिकाण आहे का? एक तर यावर निर्बंध घालावे किंवा जे नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकतात त्यांना त्यांच्या ठिकाणी कचरा टाकण्याची जागा निर्माण करून द्यावी कचराकुंडी तयार करावी.

परंतु आजरा पोलीस स्टेशनच्या समोर व आंबोली रोड – राष्ट्रीय महामार्गावर येना जाणाऱ्या पर्यटकाकडून हस्यास्पद विषय होत आहे. आजरा तालुक्यातील विविध प्रश्नावर अनेक आंदोलने होतात.
कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून यासाठी पोलीस प्रशासन या आंदोलकांना कायद्याचे पालन करण्याची सूचना देतो. त्याच पोलीस स्टेशन समोर आजरा नगरपंचायत जर कचऱ्याचे ढीगभर साचत असलेला कचरा वेळेत उचलत नसतील. मुळात व मुळात कचरा टाकण्याचे हे ठिकाणच नाही आहे. असा कचरा फेकणाऱ्या नागरिकांच्या वरती कारवाई का होत नाही.
या परिसरात असलेल्या आजूबाजूचे व्यापारी नागरिक यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आजरा पोलीस स्टेशनच्या दारात नागरिकांनी तयार केलेली कचराकुंडी ही ताबडतोब बंद करून या ठिकाणी स्वच्छता करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.
🟣पेरणोली जि. प. प्रचारार्थ जयवंतरावंचा झंजावत.- लोकप्रतिनिधी नसताना कोट्यावधीची कामे.- प्रचार फेरीत महिलांची उपस्थिती लक्षणीय.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ पेरणोली जिल्हा परिषद चे भाजपचे उमेदवार जयवंत मशीन सुतार व या मतदारसंघातील पंचायत समितीचे उमेदवार सौ. देसाई यांची प्रचार फेरी आज दि.१ फेब्रुवारी रोजी साळगाव, पेरणोली, हरपवडे, धनगरवाडा, देवकांडगाव सह पश्चिम भागातील सर्व गावांचा दौरा व गल्ली बोळातून प्रचार फेरी व घरोघरी चिन्हांची पत्रक देत पद्ययात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेमध्ये या मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी माजी सभापती माजी मसणू सुतार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रामुख्याने या प्रचार फेरीत मोठा सहभाग दिसून आला.
मतदारांच्या कडून देखील या प्रचार केलेला चांगला प्रतिसाद मिळाला.
या प्रचार फेरीत भाजपचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, तसेच प्रकाश पाटील, संभाजी सरदेसाई, रमेश बुगडे, सुरेश सावंत, अजित हरेर, तुकाराम बामणे, संदीप देसाई, विलास धडाम, बळवंत शिंत्रे, हर्षवर्धन महागावकर, राजेंद्र पाटील, विशाल आढाव, दीपक गवळी अनिकेत केळकर, विश्वास गवळी सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयवंत सुतार म्हणाले – कोणत्याही पदावर नसताना विकास निधीसह व सर्वसामान्य जनतेची कामे केली आहेत. विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचले आहेत. प्रत्यक्षात आपण सर्वांनी आशीर्वाद व माझ्यासोबत पंचायत समिती मतदार संघात असलेल्या उमेदवार यांना विजयी करून द्यावे. आज मी तुमच्यापर्यंत मध्ये मागण्यासाठी आलो आहे तुम्हाला माझ्यापर्यंत काम करून घेण्यासाठी यावे लागणार नाही. जसा तुमच्या दारात मते मागायला आलो आहे. तसाच आपली कोणती कामे आहेत ते विचारण्यासाठी दारात येईल रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. असे आवाहन मतदारांना जि. प. उमेदवार श्री सुतार यांनी केले.
