गुलाल आपलाच आहे. गाफिल राहू नका.- माजी. आम. राजेश पाटील.
( पेरणोली जिल्हा परिषदसाठी सुधीर देसाई यांचा उमेदवारी जाहीर व अर्ज दाखल.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून.
रविवार वगळता मागील दिवसापासून एक अर्ज दाखल झाला नव्हता. पण सोमवार दि. १९ रोजी मोठ्या शक्तिप्रदर्शन करत माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आम. श्री. पाटील म्हणाले पेरणोली जि. प. साठी दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा गट अशी महाविकास आघाडी चे उमेदवार म्हणून जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई हे आहेत. त्याच्या पाठीशी राहून विजयश्री खेचून आणायचा आहे. नाम हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत श्री देसाई यांचे नांव एकमताने निश्चित करण्यात आले. या पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील दोन्ही पंचायत समिती उमेदवार मंगळवारी जाहीर करण्यात येतील. आपण या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी राहून प्रचारासाठी कामाला लागावे घरोघरी जाऊन आपली घड्याळ चिन्ह पोहोचवावे व विजयाचा गुलाल खेचून आणावा. असे बोलताना माजी आम. श्री पाटील म्हणाले.

यावेळी मुकुंददादा देसाई, अनिल फडके, युवराज पोवार, निवृत्ती कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी कारखाना चेअरमन वसंतराव धुरे, संभाजी पाटील, राघव सरदेसाई, आजरा साखरचे राष्ट्रवादीचे सर्व संचालक, पेरणोली जिल्हा परिषद व आजरा तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना उबाठा
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
