🟣आजरा ता जि. – परिषद ५, पं – समिती ९ अर्ज दाखल – शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करण्याची अनोखं चित्र.
🟣आजरा नगरपंचायत – विविध नवीन समित्या सदस्य जाहीर
🛑आजरा ता जि. – परिषद ५, पं – समिती ९ अर्ज दाखल – शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करण्याची अनोखं चित्र.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी ५ तर पंचायत समिती ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दि. २० अखेर दोन जिल्हा परिषदेसाठी ४४ तर ४ पंचायत समितीसाठी ५५ अर्ज विक्री झाले आहेत.
💥उत्तूर जिल्हा परिषद
दाखल अर्ज – शिरीष हिंदूराव देसाई, विठ्ठल महादेव उत्तूरकर (प्रत्येकी एक)
💥पेरणोली जिल्हा परिषद
दाखल अर्ज- सुधिर राजाराम देसाई (२) ,सुरेश कृष्णा शिंगटे, सुपल सुधीर रामदास, रणजीतकुमार सुर्यकुमार सरदेसाई (प्रत्येकी एक)
💥उत्तूर पंचायत समिती
विकास वसंत चोथे, चंद्रकांत ईश्वर गोरुले (प्रत्येकी एक)
भादवण पंचायत समिती
विजया जर्नादन निऊंगरे(२)
💥पेरणोली पंचायत समिती

यशोदा युवराज पोवार, रचना राजाराम होलम, श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (प्रत्येकी एक)
💥वाटंगी पंचायत समिती
किरण विश्वनाथ कोरे, भिमराव गणपती वांद्रे (प्रत्येकी एक)

चौकट
बुधवार दि. २१ रोजी पेरणोली जिल्हा परिषद व उत्तुर जिल्हा परिषद तसेच चार पंचायत समिती मतदार संघात उमेदवारांची संख्या वाढणार आहे. विविध पक्षाने उमेदवारी डाबरल्याने बंडखोरी व अपक्ष उमेदवारांची झुंबड उडणार आहे. दि. २१ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. कोण कोणासोबत तर कोणाची आघाडी कोणासोबत यामध्ये चालू असलेल्या राजकारणामुळे आश्चर्य वाटू नये. पेरणोली जिल्हा परिषद, मतदारसंघात अनेकांना यापूर्वी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे इच्छुक उमेदवार मागील अनेक दिवसापासून व जाहीर झाल्यानंतर नियमित नेत्यांच्या दारावर आहेत. भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, तर राष्ट्रीय काँग्रेस देखील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदार संघात अर्ज दाखल करणार आहेत. परंतु कोणाला कोणत्या पक्षाचा एबी फॉर्म मिळणार याबाबत निश्चितपणे अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराला देखील सांगता येणार नाही. अशी परिस्थिती आहे. परंतु दोन्ही जिल्हा परिषद व चार पंचायत समिती मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
🟣आजरा नगरपंचायत – विविध नवीन समित्या सदस्य जाहीर
आजराः – प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत अंतर्गत विविध विषयांच्या नवीन समित्या जाहीर झाल्या. अपेक्षेप्रमाणे सर्व समितींचे सभापती ताराराणी आघाडीचे आहेत. सर्व समितीचे नगरसेवक सभापती ताराराणी आघाडीचे नगरसेवक आहेत. याबाबत जोरदार चर्चा आहे. या विविध समिती सदस्य निवडीबाबत आज येथील नगरपंचायत सभागृहात बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी, सीइओ सुरज सुर्वे तसेच अन्य विभागाचे प्रमुख व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
यातील महत्वाच्या बांधकाम समिती सभापती पदावर ताराराणी आघाडीच्या श्रीमती रहीतबी खेडेकर असतील. तर त्या समितीचे सदस्य सौ. अश्विनी चव्हाण, सौ. अन्वी केसरकर, मुसासरफराज पटेल व परशुराम बामणे आहेत.
अन्य समिती आणि येथील सभापती व सदस्य असे
शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ. पुनम किरण लिचम, सदस्य अनिकेत चराटी, सौ. अन्वि अनिरुद्ध केसरकर, निसार लाडजी, विक्रम पटेकर, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सौ. पूजा अधिन डोंगरे व सदस्य सौ. आसावरी महेश खेडेकर, सौ. पनम किरण लिचम, अभिषेक शिंपी असे समिती सदस्य आहेत.

