,”विश्वासू सहकारी यांना बळ देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात. माजी जि.प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांचे प्रतिपादन.
आजरा.- प्रतिनिधी.

पक्ष व स्थानिक गटासाठी ज्या – ज्या कार्यकर्त्यांनी बऱ्या- वाईट वेळेमध्ये दिलेली साथ, याची जाणीव ठेवून माझ्या दुसऱ्या फळीतील विश्वासू व कार्यक्षम कार्यकर्त्यांना तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या कामात बळ देण्याचा निर्णय समविचारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तालुक्याचे ज्येष्ठ नेते व जि. प.चे माजी उपाध्यक्ष जयंतराव शिंपी यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पं. स. माजी सभापती भिकाजी गुरव यांनी सद्या देशात व राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता योग्य निर्णय घ्यावा. असे मत व्यक्त केले, त्यानंतर आजरा नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक अभिषेक शिंपी बोलताना म्हणाले राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )या दोन्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीत व निवडणुकीनंतरही महाविकास आघाडीच्या विचारांची आघाडी केली व त्याचीच पुनरावृत्ती जि. प. व पं.स.च्या निवडणुकीतसुद्धा करत असल्याने, आम्हाला.. आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी या दोघांपासून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आहे असे सांगून त्यांना पाठबळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यानंतर श्री. शिंपी, ज्येष्ठ सहकारी के.जी. पटेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली यामध्ये कार्यकर्त्यांनी श्री. शिंपी जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील राहून गटाला विजयापर्यंत नेऊ असे आश्वासित केले. याप्रसंगी लहू पाटील, आनंदराव कुंभार, मुकुंद तानवडे, विष्णू पाटील, शिवाजी लाड, सहदेव नेवगे, दत्ता पाटील यांनी आपले विचार मांडले. या कार्यकर्ता मेळाव्यासाठी सदाशिव डेळेकर, अप्पासाहेब सरदेसाई, तुकाराम पाटील, धनाजी सावंत, दौलत कांबळे, दिगंबर पाटील, तानाजी पोवार, सतीश फडके, जोतिबा खामकर, विलास कुंभार, शामराव खामकर (पोळगाव), विष्णू कांबळे, कृष्णा डेळेकर, श्रावण कांबळे, मनोहर जगदाळे , बाळासाहेब चव्हाण आणि भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पाटील- अर्दाळकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी व्ही पाटील यांनी केले. आभार विलास पाटील यांनी मानले.
