Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने जळीत दुकानदारांना २ लाख.३० हजारची मदत

आजऱ्यातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने जळीत दुकानदारांना २ लाख.३० हजारची मदत

आजऱ्यातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने जळीत दुकानदारांना २ लाख.३० हजारची मदत

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरात जळीत झालेल्या दुकानदारांना आजरा एकसंघ व्यापारी असोसिएशनच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.प्रत्येकी 23 हजार रुपये देण्यात आले.
यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर म्हणाले, मानवतेच्या दृष्टिकोनातून आजऱ्यातील लहानमोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला.आम्ही जळीतांना सर्व मदत करु शकलो नसलो तरी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांना भेटून धीर दिला.उभे राहण्याची हिंमत दिली.


सद्या अनेक कारणांनी बाजारपेठ शांत आहे. व्यापाऱ्यांच्यापुढे उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रश्न उभारला आहे. असोसिएशन याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानांचा विमा करुन घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी जळीत दुकानदार नेवरेकर म्हणाले, आम्हाला रक्कम किती मिळाली याला महत्त्व नाही मात्र असोसिएशनने दिलेल्या दिलाशामुळे आमच्यात नवीन उमेद निर्माण झाली आहे.या उमेदीने पुन्हा उभा राहण्याचे बळ मिळाले आहे.

यावेळी व्यापारी संघटनेचे सदस्य संजय हरेर, सचिन इंदुलकर, दयानंद भोपळे, मल्लिकार्जुन तेरणी, संगम गुंजाटी, मनोज गुंजाटी, यशवंत इंजल, निलेश घाटगे,राजू विभुते, शिवाजी गुडुळकर,वृषाल हुक्केरी यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.