जिल्हा परिषद / पंचायत समिती – साठी उमेदवारीची तयारी आधीपासूनच.- आजरा ता. जि. प. पं. स साठी इच्छुक उमेदवारांची गर्दी. अद्याप एकही अर्ज नाही
आजरा – प्रतिनिधी.
मागील एक वर्षापासून आजरा जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारीची तयारी आधीपासूनच सुरू आहे. दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती मतदार संघातील इच्छुक उमेदवार मागील सहा महिन्यापासून गावोगावी दौरा व मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. यात काही उमेदवार आघाडीवर आहेत.
आजरा जि. प. पं. स साठी इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे परंतु कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळते किंवा स्थानिक गटांची यावरून निकाल अवलंबून आहेत. होऊ घातलेल्या निवडणूक तारीख. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी परिणाम जाहीर होणार असून
निवडणूक क्षेत्र १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे
आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मतदान दोन मते द्यायची आहेत – एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती गणासाठी निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे. आणि १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
आजरा तालुक्यातील उत्तुर जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकांच्या तारख्या जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटातून या जिल्हा परिषदेला शिरीष देसाई यांची उमेदवारी नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली होती. पण यापूर्वी तीन वेळा या जिल्हा परिषद मधून विजयी झालेले उमेश आपटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तर भाजपकडून विठ्ठल उत्तुरकर, इच्छुक आहेत. अन्य काही उमेदवार या मतदारसंघात असू शकतात परंतु उत्तुर पंचायत समिती, व भादवण पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार रिंगणात असतील परंतु अशा युती न होता स्थानिक आघाडी झाल्यास या दोन्ही पंचायत समितीमध्ये एकास एक उमेदवारासह अपक्ष उमेदवार असतील. परंतु प्रत्यक्षात अर्ज दाखल करून माघारीच्या नंतर खरे चित्र स्पष्ट होईल..
क्रमशः…




