निवडणुक विभागाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे नियम पाळावेत. – आजरा तहसीलदार तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी समीर माने.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा ता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडणुक विभागाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे नियम पाळावेत आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. असे आवाहन आजरा तालुक्याचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी समीर माने यांनी केले.

येथील तहसीलदार कार्यालय दालनात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न झाली. यावेळी तहसीलदार यांनी नामनिर्देशन पत्रासह विविध गोष्टीबाबत माहीती दिली व सूचना केल्या. या वेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, आजरा पोलीस ठाण्याचे सपोनि नागेश यमगर उपस्थित होते. तहसीलदार श्री. माने म्हणाले, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आचार संहितेबाबत निवडणुक विभागाचे नियम आहेत. ते सर्वांनी पाळावेत. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी. तसेच नामनिदर्शन पत्र भरण्यासाठी आफ लाईन भरण्याची व्यवस्था केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आवश्यक शुल्क, अर्ज कसा भरावा, नामनिदर्शनासाठी शुल्क, अर्ज भरण्याची वेळ, कार्यक्रमातील सुट्टया, उमेदवार अर्ज भरण्याविषयी माहीती व माघार, खर्चासंबंधीची मर्यादा, खर्चाचे हिशेब, त्यासाठी बँकेत खाते उघडणे या विषयींही माहीती दिली. जिल्हा परिषद गट व पंचायत समितीमधील मतदान केंद्र, द्वार मतदान याबाबत माहीती दिली. पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन या वेळी श्री. माने यांनी केले. यावेळी मानसिंग, देसाई, संजय पाटील, जनार्दन निऊंगरे, सुधीर सुपल, संदिप चागुले, शिरीष देसाई, समीर पारदे, सी. आर. देसाई, राजू पोतनीस, रणजित सरदेसाई, श्वेता सरदेसाई, संतोष चौगुले, अजित हरेर, विलास पाटील, अशोक पोवार, रणजित मोहीते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
