Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रउत्तुर येथे साकारतय - आंतरराष्ट्रीय दर्जाचे निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय...

उत्तुर येथे साकारतय – आंतरराष्ट्रीय दर्जाचे निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय १८ एकरचा विस्तीर्ण निसर्गरम्य परिसर ( स्थानिक बाजारपेठेसह अर्थकारणावर होणार परिणाम – राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्रही प्रस्तावित.)

उत्तुर येथे साकारतय – आंतरराष्ट्रीय दर्जाचे निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय १८ एकरचा विस्तीर्ण निसर्गरम्य परिसर ( स्थानिक बाजारपेठेसह अर्थकारणावर होणार परिणाम – राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्रही प्रस्तावित.)

उत्तुर.- वार्ताहर .

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून उतूर ता. आजरा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय साकारत आहे. सध्या रू. २५० कोटी इंग्रजी मंजूर असलेला हा प्रकल्प पूर्ण होऊन सर्व अनुषंगिक सेवा सुविधांसह रु. १,००० कोटींच्या घरात जाऊ शकेल इतका व्यापक आहे. या महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य इमारतींसह, मुले आणि मुलींची वस्तीगृहे, सर्विस ब्लॉक्स, अधिष्ठाता बंगला, अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने इतर सर्व इमारती, पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटर्स, संरक्षक भिंत व अनुषंगिक भौतिक सोयीसुविधा ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. त्या अनुषंगाने हा आढावा…….

भारतीय पारंपरिक निसर्गोपचार व योगशास्त्राला भारतासह सबंध जगभरातूनच मान्यता मिळालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तुर ता. आजरा उत्तुरच्या (ता. आजरा) उत्तरेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय साकारत आहे. या मेडीकल हबमुळे जागतिक दर्जाचे मेडिकल टुरिझम वाढून साहजिकच त्याचा परिणाम या परिसराच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय वृध्दीवरही होईल. सुरवातीची दोन वर्षे ते बहिरेवाडी येथे सुरू आहे. इमारत पूर्ण होताच ते उत्तूर येथे जाणार आहे.

दृष्टिक्षेपात निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय…….
□ विविध नऊ बाह्यरुग्ण विभागांतून मिळणार रूग्णसेवा
□ सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त सहा आंतररुग्ण विभाग
□ सुसज्ज कॅज्युअल्टी विभाग
□ दरमहा १५, ००० हून अधिक रुग्णांना मिळणार सेवा
□ महाविद्यालय प्रवेश क्षमता: ६०
□ हॉस्पिटल बेड संख्या: १००
□ मुलांचे वसतिगृह क्षमता: २००
□ मुलींचे वसतिगृह क्षमता: २००
□ चिकित्सा केंद्र
□ बहुउदेशीय हॉल
□ योगा हॉल
□ योगावर आधारीत चालण्याचा ट्रॅक
□ स्टाफ कॉर्ट्स
□ सुसज् ग्रंथालय
□ सुसज्ज प्रयोगशाळा
□ नॅचरोपॅथी थेरपीज केंद्र
□ ऑडिटोरियम
□ ट्रिटमेंट केंद्र
□ डायट सेंटर
□ स्विमिंग पूल
अशा अनुषंगिक सेवासुविधा आहेत.

💥स्थानिक अर्थकारणावर होणार परिणाम……!
निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाची ही जागा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांशी संलग्न आहे. केरळप्रमाणे येथेही “मेडिकल हब” निर्माण होऊन “ईंटरनॅशनल मेडिकल टुरिझम” वाढणार आहे. स्थानिक अर्थकारणावर फार मोठा परिणाम होणार आहे. उत्तुर विभागातील गावांचे उत्तूर हे मुख्य केंद्र व बाजारपेठ आहे. बाहेरील प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण व मुलांना बंगलो, फ्लॅट्स आणि खोल्या लागतील. शैक्षणिक साहित्यासह साहजिकच हॉटेल्स आणि खानावळ धंद्यालाही बरकत येईल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी पाच हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होईल. साहजिकच स्थानिक बाजारपेठेला महत्व येईल.

💥स्वतंत्र पाणीपुरवठा योजना….!
या निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालयासाठी अडीच कोटी निधीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार होत आहे. आंबेओहळ प्रकल्पाच्या खालील बंधाऱ्यावरून आरसीसी विहीर बांधून चार किलोमीटर अंतराच्या सहा इंची एचडीपी पाईपमधून हे पाणी आणले जात आहे. रुग्णालय परिसरात दोन लाख लिटरची टाकी व फिल्टर हाऊससह पाणीपुरवठा होणार आहे.

💥प्रस्तावित राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र…..!
याच परिसरात १०० प्रशिक्षणार्थी क्षमता असलेल्या दहा एकर जागेवरील राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण संस्थेला प्राथमिक मान्यता मिळालेली आहे. साधारणता अडीचशे कोटी निधीतून एकाच छताखाली वैद्यकीयसह आयुर्वेदिक, दंतशास्त्र, होमिओपॅथी, पॅरामेडिकल या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स व तंत्रज्ञांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहेत. शासकीय फिजिओथेरपी महाविद्यालय व रुग्णालय व पंचकर्म सेंटरही प्रस्तावित आहे.

💥अंतर्गत रस्ते, गटारी व रीटेनिंग वॉल…
रुग्णालय परिसरात साधारणता १५ कोटींचे अंतर्गत रस्ते प्रस्तावित आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार असून त्यांच्या दुतर्फा आरसीसी गटारी व रिटेनिंग वाॅलचीही तरतूद आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.