लाभार्थ्यांचे थकीत हप्ते तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावेत.- आजरा उबाठा सेनेची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील शिवसेना उबाठा सेनेच्या वतीने विविध योजनेचा निधी लाभार्थ्यांना दिल्या असल्याबाबत आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना, अटल बांधकाम आवास योजना, बालकल्याण योजना तसेच रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांचे थकीत हप्ते तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावेत, अन्यथा शासनाविरोधात जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवसेना (उ.बा. ठा.) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे लेखी निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले..

या विविध आवास योजनांतून अनेक गोरगरीब लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात केली आहे. मात्र शासनाकडून दुसरा व तिसरा हप्ता वेळेत न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. काही लाभार्थ्यांना ५ ते १० टक्के व्याजाने सावकारी कर्ज काढून बांधकाम सुरू ठेवावे लागत आहे. तर काही कुटुंबे जनावरांच्या गोठ्यात राहण्यास, तर काहींना भाड्याच्या घरात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेकांची घरे पूर्ण झाली असतानाही हप्ता न मिळाल्याने आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. सदर थकीत हप्ते त्वरित न दिल्यास पंचायत समितीवर शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पवार, उपतालुकाप्रमुख संजय येसादे, शिवाजी आढाव सह शिवसेना युवा सेना चे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
