राज्यातील पहिले – शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय प्रगतीपथावर.. उत्तूर ता. आजरा नजीक होणार – महाराष्ट्रातील पहिले – शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय.- नाम. हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांना यश.
आजरा.- प्रतिनिधी.
महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्टातील पहिले ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रुग्णखाटांचे रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग. शासन निर्णय क्र. नॅचरो-२०२४/प्र. क्र.३३४/२४/शिक्षण-१, दि.२१.०८.२०२४ चे शासन निर्णयान्वये उत्तुर, ता. आजरा जिल्हा कोल्हापूर येथे स्थापन करण्यांस शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच हे बी.एन.वाय.एस. या अभ्यासक्रमास व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता मिळाली आहे. याबाबतच्या माहितीची विचारणा केली असता. शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली.

यानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन निर्णय क्र. नॅचरो-२०२४/प्र. क्र.३३४/२४/शिक्षण-१, दि.१२.०९.२०२४ चे शासन निर्णयान्वये उत्तुर, ता. आजरा, जिल्हा कोल्हापूर येथे योग व निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६० विद्यार्थी प्रवेशित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मौजे उत्तूर ता. आजरा, जि. कोल्हापूर येथील धामणे रोडवरील गट क्र. १५१७/१ ची एकूण ६.०० हे. आर इतकी जमीन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे क्र. कार्यासन-३ई/जमीन/आरआर/२०५/२०२४ दि. २८.०८.२०२४ अन्वये महाविद्यालयास जमीन हस्तांतरण झाले असून सद्यस्थितीत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय व अनुषंगिक बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे.
( सद्यस्थितीत चालू असलेल्या बांधकामाचा आढावा
अंदाजपत्रकीय किंमत / प्रशासकीय मान्यता प्राप्त रक्कम (रुपये लक्ष ८५३२.०८ ) असून

🟣अत्याधुनिक सेवा सुविधा असलेले शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रुग्णखाटाचे रुग्णालय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाचे कक्ष, परिसर सुशोभीकरण, मुला मुलींचे वस्तीग्रह, प्राध्यापक व सह प्राध्यापकांसाठी, सह अंतंत्रिक कर्मचारी व लिपिक वर्ग यांची निवासस्थानाची व्यवस्था, अशा वेगवेगळ्या सुविधांनी असे हे शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय आजरा तालुका सारख्या ग्रामीण भागात होत आहे. अभिमानाची गोष्ट आहे. सद्यस्थितीत मौजे बहिरेवाडी येथील जेपी नाईक स्मारक सभागृहाच्या अंतर्गत वास्तू रचनेमध्ये बदल करून सद्यस्थितीत या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024 25 व 2025 26 अशा दोन बॅच प्रवेशित झाल्या असून त्याचे शैक्षणिक कार्य नियमित प्रमाणे सुरू आहे तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे शैक्षणिक वर्ष 2024 25 व 2025 26 याकरता संलग्न करण प्राप्त झाले आहे शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयाच्या व संघलनीत ६० रुग्ण खाटांचे रुग्णालय करिता पद निर्मिती झाली असून यासोबतच तज्ञ वैद्य व अध्यापक यांची मानसेवी तत्वावर नेमणूक करण्यात आली आहे. शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय कोल्हापूर साठी स्वातंत्र्य लेखाशीर्ष मंजूर करण्यात आलेले आहे तसेच शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व संलग्न रुग्णांचे अधिष्ठान यांना सादर शासकीय योजना अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच या महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांना सादर सदर महाविद्यालयाचे आहरण व संवितरण संकेतांक झाले आहेत.

यासोबत अध्यापक वैद्यकीय अधिकारी परा वैद्यकीय कर्मचारी यांचा कौशल्य विकास व कार्यक्षमता वाढ तसेच राज्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुष्य परा वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न गीत रुग्णालय यांचे मार्फत प्रधान करण्यात येणारे शिक्षण व आरोग्य सेवा यांच्या दर्जात वाढ करणे याकरिता उत्तुर तालुका आजरा येथे १०० प्रशिक्षणार्थी क्षमतेचे राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे यामध्ये २५ प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रस्थापित आहेत या प्रशिक्षण केंद्रात संभाव्य प्रशिक्षणार्थी संख्या अंदाजे ८०० ते ९०० असेल याबाबतची माहिती डॉ. भाग्यश्री खोत ( अधिष्ठाता शासकीय योग निसर्गोपचार महाविद्यालय रुग्णालय ) अश्विन कचरे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, महादेव तिवले ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता, अक्षय डोईफोडे आर्किटेक, विक्रम कदम शाखा अभियंता तसेच राहुल पाटील व विभागीय अधिकारी यांनी संबंधित माहिती दिली.
