🟣आजऱ्यात ७५ पूर्ण केलेल्या निवृत्त एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
🛑डॉ. अनिल देशपांडे यांची महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सीलच्या राज्यस्तरीय कमिटीवर निवड.
🟣आजऱ्यात ७५ पूर्ण केलेल्या निवृत्त एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी

आजरा येथील हनीफा एज्युकेशन ट्रस्ट व ए.एस. दरवाजकर ( बाबू दरवाजकर) यांच्या संयुक्त विद्यमानाने अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
७५ पूर्ण केलेल्या २२ निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला
येथील सबाज फार्म हाऊसवर पार पडलेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा या निमित्ताने मिळाला.हनीफा ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्नेहमेळाव्यासाठी ठाणे, पुणे, कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड, कोवाड, करियात आणि नेसरी या भागांतून सुमारे २०० हून अधिक निवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटल्यामुळे सर्वच कर्मचारी भारावून गेले होते. संपूर्ण फार्म हाऊसचा परिसर जुन्या मित्रांच्या गप्पा आणि आठवणींनी प्रसन्न झाला होता.
कार्यक्रमात सोनकर आणि माजी डीटीओ एस. के. पाटील यांनी आजरा आगाराच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाच्या आणि यशाच्या आठवणी जागवल्या.ए. एस. दरवाजकर यांनी आपल्या कार्यकाळात कामगारांच्या हितासाठी जे कार्य केले त्याबद्दल सर्व वक्त्यांनी गौरवोद्गार काढले.
🛑डॉ. अनिल देशपांडे यांची महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सीलच्या राज्यस्तरीय कमिटीवर निवड.
आजरा.- प्रतिनिधी.

डॉ. अनिल देशपांडे यांची महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सीलच्या राज्यस्तरीय कमिटीवर निवड
या कमिटीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृतीद्वारे उत्तम मानसिक व शारीरिक आरोग्य राखण्यासाठी व विविध आजरांपासून संरक्षक करण्यासाठी आरोग्य शिबीरे, कार्यशाळा, लसीकरण यांचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखा, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, आशा सेविका व विविध सहकारी संस्थेचे मदतीने आयोजन करून कॅन्सर, डायबेटीस, हृदयरोग व विविध साथीचे आजार यांचे प्राथमिक स्तरावर निदान करणे व त्यावरील पुढील उपचार करणेसाठी मदत करणे या ध्येयाने ही कमिटी काम करते.
डॉ. संतोष कुलकर्णी अध्यक्ष IMA महाराष्ट्र राज्य व डॉ. विक्रांत देसाई सेक्रेटरी IMA महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन खाली राज्यातील विविध विभागामध्ये Public Health Awareness Programme राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
